Nagpur Police Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: हिवाळी अधिवेशनात पोलिसांची पहिल्याच दिवशी अडचण, जेवण संपल्याने उपाशी राहण्याची वेळ

पोलिसांसाठी असलेले जेवण संपल्याने अनेक पोलीस कर्मचारी उपाशी आहेत.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : हिवाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र नेतेमंडळींच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची उपासमार सुरु असल्याचं चित्र समोर आलं आहे. पोलिसांसाठी असलेले जेवण संपल्याने अनेक पोलीस कर्मचारी उपाशी आहेत.

काही पोलीस सकाळपासून मोर्चाच्या बंदोबस्तावर होते. त्यामुळे अनेकांना जेवण मिळालं नाही. साम टीव्हीने यासंबंधीची बातमी दाखवल्यानंतर आता दुपारी चार वाजता जेवण मिळालं आहे. मागच्या वेळी देखील अशीच परिस्थिती पोलिसांवर उद्धभवली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशनात ड्युटीवर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना आज पहिल्याच दिवशी अडचणींचा सामना करावा लागला. विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलिसांच्या जेवणाच्या स्टॉलवर जेवण अपूर्ण पडल्याने अनेक पोलिसांना उपाशी राहावे लागले. पोलिसांना 250 रुपयात 10 दिवसांच्या जेवणाचे कूपन देण्यात आले होते. मात्र कूपन घेऊन देखील जेवण कमी पडले होते.

राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी पोलिसांच्या या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. पोलिसांचा फक्त गैरवापर हे सरकार करत आहे. आता तर कहर झाला आहे. दिवसभर सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना चार वाजले तरी पोलिसांना जेवणाचा पत्ता नाही. अधिवेशनासाठी जो खर्च होतो तो पैसा मग जातोय कुठे? असा सवाल देखील विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT