Buldhana Accident Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Accident : मद्यधुंद अवस्थेत पोलीस कर्मचाऱ्याचे गाडीवरील नियंत्रण सुटलं; 3 वाहनांना धडक

बुलडाण्यातील विचित्र अपघात

संजय जाधव

Buldhana News : बुलढाण्यात (Buldhana) एक विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनाचा अपघात झाला. या वाहनाने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून या पोलीस कर्मचाऱ्याने तीन वाहनांला धडक दिल्याची घटना घडली आहे. हा पोलीस कर्मचारी खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे.

अपघात नेमका कसा झाला?

खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेमध्ये शेगाव खामगाव रोडवर गाडी चालवत होता. यावेळी पोलिसाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि 3 वाहनांना धडक दिली. नंतर अपघातग्रस्त पोलीस वाहन एका झाडावर जाऊन आदळलं. गाडीचा चालक नशेत असल्याने सदरची घटना घडली.

नगर-औरंगाबाद महामार्गावर मोठा अपघात

अहमदनगरमध्ये मोठा अपघात झाला आहे. नगर-औरंगाबाद महामर्गावर कायगाव (ता.गंगापूर) झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर कायगाव जवळील गोदावरी शाळेच्या समोर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बजाजनगर येथील चार व्यावसायिकांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT