Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : सुट्टीवर जवान आला अन् दारूच्या नशेत भरधाव कार चालवली, ३० लोकांना कट मारला

army soldier drunk drives car into crowd in nagpur : रामटेकमधील नगरधन येथे सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून ३० जणांना कट मारला. गावकऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडलं.

Namdeo Kumbhar

  • लष्करात कार्यरत जवानाने दारूच्या नशेत कार चालवली.

  • नागपूर जिल्ह्यातील नगरधन येथे ३० जणांना कट मारला.

  • संतप्त गावकऱ्यांनी आरोपीला पकडून चोप दिला.

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला.

soldier on leave injures villagers while drunk driving : उपराजधानी नागपूरमधील रामटेकमध्ये भीषण अपघात झालाय. सुट्टीवर आलेल्या जवानाने दारूच्या नशेत कार चालवत ३० लोकांना कट मारला. नगरधन येथे रविवारी रात्री हा अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी पाठलाग करत त्याला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेत रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. हर्षपाल महादेव वाघमारे असे आरोपीचे नाव आहे.

हर्षपाल महादेव वाघमारे याचे रामटेक तालुक्यातील नगरधन येथे कारवरील नियंत्रण सुटले. त्याने २५ ते ३० लोकांना कट मारला. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत कार चालवत होता. त्यामुळे त्याने २५ ते ३० लोकांना कट मारली. संतप्त गावकऱ्यांनी पाठलाग करत त्याला चांगलाच चोप दिला. ही घटना रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत नगरधन येथे सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

हर्षपाल महादेव वाघमारे असे नाव असून, तो भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असल्याची माहिती आहे. तो चार दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता. त्याला दारूचे व्यसन असल्याचं सांगितलं जातं. नगरधनचा साई मंदिर, दुर्गा चौक मार्गे हमलापुरीकडे जात असताना कारवरील ताबा सुटला आणि बेदरकारपणे गाडी चालवत होता. कार नाल्यात जाऊन पलटी झाली. रामटेक पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील तरुणाला ताब्यात घेतले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : फॅमिली ट्रिपसाठी पनवेलजवळील सुंदर लोकेशन, वीकेंडला 'येथे' होते पर्यटकांची गर्दी

Maharashtra Live News Update: महिलांच्या डब्यात बुरखा घालून फिरणारी व्यक्ती रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Thursday Horoscope: कामाच्या ठिकाणी राहा सावध, 5 राशींची होणार चांदीच चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने दिली भयंकर शिक्षा, शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलाथन्याने दिले ४० फटके

अजित पवारांच्या प्रेमकोर्ट बंगल्यावरील विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरेही? खरं काय आणि खोटं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT