Dr. Narendra Dabholkar Death Case Timeline:  Saamtv
महाराष्ट्र

Dr. Narendra Dabholkar Death Case: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण! दोघांना जन्मठेप, ३ जण निर्दोष; ११ वर्षात काय काय घडलं? वाचा घटनाक्रम

Dr. Narendra Dabholkar Death Case Timeline: अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे प्रणेते, अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तब्बल ११ वर्षांनी निकाल लागला. या प्रकरणात न्यायालयाने दोन आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून सबळ पुराव्याअभावी तीन आरोपींची मुक्तता निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. ९ मे २०२४

अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे प्रणेते, अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तब्बल ११ वर्षांनी निकाल लागला. या प्रकरणात न्यायालयाने दोन आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून सबळ पुराव्याअभावी तीन आरोपींची मुक्तता निर्दोष मुक्तता करण्यात आली. २०१३ ते २०२४ तब्बल ११ वर्ष चाललेल्या या प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या संपूर्ण हत्या आणि निकालाचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर.

२० ऑगस्ट २०१३... हत्येने महाराष्ट्र हादरला

दिनांक २० ऑगस्ट २०१३. पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर हे मॉर्निंग वॉकसाठी आले होते. यावेळी दबा धरुन बसलेले आरोपी दुचाकीवरुन आले अन् त्यांनी डॉ. दाभोलकर थांबवून अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.

पुणे पोलिसांकडून तपास सुरू..

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पुरोगामी चळवळीच्या समर्थकांनी आंदोलने, मोर्चे काढले. ज्यानंतर तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या आदेशानुसार पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

मे २०१४: सीबाआयची एन्ट्री

डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात दोन आरोपींना अटकही करण्यात आली होती. मात्र या आरोपींनी तपास अधिकाऱ्यांचं गंभीर आरोप केले. ज्यानंतर पुणे पोलिसांचा तपास वादाच्या भोवऱ्यात सापडला. पुणे पोलिसांचा तपास भरकटत असल्याचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणात सीबीआयची एन्ट्री झाली अन् मे २०१४ मध्ये दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे केला.

जून २०१६: पहिला आरोपी अटकेत

सीबीआयने तपास झाली घेतल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजे जून २०१६ मध्ये पहिला आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला पनवेलमधून अटक करण्यात आली. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हा सनातन संस्थेशी संबंधित आरोपी होता. त्यानंतर सप्टेंबर २०२६ मध्ये डॉ. वीरेंद्रसिंह तावडेवर हत्या आणि हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

ऑगस्ट २०१८: दोघांना अटक

त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्य महाराष्ट्र एटीएसकडून वैभव राऊत आणि शरद कळसकर याला अटक करण्यात आली होती. तर मे २०१९ मध्ये आणखी दोन आरोपी व्यवसायाने वकील असलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला सीबीआयकडून अटक करण्यात आली.

सप्टेंबर २०१९.. पाच आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल..

सप्टेंबर २०१९ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात आरोपी म्हणून दाखविलेल्या सनातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांची नावे दोषारोपपत्रातून वगळली. त्यानंतर एका वर्षाने पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित केले.

१० मे २०२४: निकाल

ऑक्टोंबर २०२१ मध्ये सीबीआयने अटक केलेल्या आरोपींविरोधात खटला सुरू करण्यात आला. ज्यानंतर आज १० मे म्हणजेच तब्बल ११ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. या निकालाप्रमाणे तिघांची निर्दोष मुक्तता तर दोघांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

SCROLL FOR NEXT