मुंबई : डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात (Dr. Narendra Dabholkar murder case) दोन वर्षांनंतर जामीन मिळून तुरुंगाबाहेर आलेला आरोपी विक्रम भावे (Vikram Bhave) याला मुंबई हायकोर्टाकडून जामिनाविषयीच्या अटीतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. (Vikram Bhave, accused in Narendra Dabholkar murder case, has been granted temporary bail)
आरोपी विक्रम भावे याच्याॉ वडिलांचे २५ जूनला निधन झाल्याने विविध विधी व वडिलांशी संबंधित बँकिंगचे व्यवहार करण्यासाठी तीन आठवड्यांपुरते रत्नागिरीत राहण्याची मुभा देण्यात आली आहे . ६ मे रोजी जामीन मंजूर करताना मुंबई हायकोर्टाने घातलेल्या अटींप्रमाणे भावेला पुण्यातील विशेष एनआयए कोर्टाच्या हद्दीतच रहावे लागणार आहे.
तसेच, रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी निघण्यापूर्वी आणि १० ऑगस्ट रोजी परतल्यानंतर पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात हजेरी लावून तपशील देण्याचे हायकोर्टाचे निर्देश दिले आहेत. रत्नागिरीमधील देवरूख पोलिस ठाण्यातही दर रविवारी हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने भावेला दिले आहेत.
कोण आहे हा विक्रम भावे
हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून विक्रम भावे हा काम करत होता. ४ जून २००८ रोजी ठाण्यातील पनवेलमधील थिएटर आणि गडकरी रंगायतन याठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी विक्रमला १० वर्षांची शिक्षा झाली होती. मधल्या काळात त्याची जामिनावर बाहेर होता. डॉ. नरेंद्र दाभोळकरांना ज्या ठिकाणी गोळी मारली जाणार होती त्या ठिकाणची भावेने पुर्वतपासणी केली होती. दाभोळकरांच्या खुनासाठी वापरलेलं पिस्तूल नष्ट करण्यासाठी भावेने मदत केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.