Pankaja Munde meets Gauri Garje’s grieving parents; assures fair and transparent investigation. saam tv
महाराष्ट्र

Gauri Garje Death Case:...म्हणून मी पोलिसांना फोन केला नाही; गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

Pankaja Munde Meet Gauri Garje Family: पंकजा मुंडे यांनी मयत गौरी गर्जे पालवे यांच्या कुटुंबीयांच्या भेट घेतली. पीए अनंत गर्जे यांच्या जाचास कंटाळून गौरी गर्जे पालवे यांनी आत्महत्या केली आहे. पंकजा मुंडे समोर आई आणि वडिलांनी टाहो फोडला.

Bharat Jadhav

  • पंकजा मुंडे यांनी गौरी गर्जे पालवे यांच्या कुटुंबीयांच्या भेट घेतली.

  • हस्तक्षेप नको म्हणून मी पोलिसांना फोनही केला नाही- पंकजा मुडे

  • माझ्याकडे १० पीए ३६ जणांचा स्टाफ आहे.

अनंत गर्जेला पाठीशी घालणार नाही. पोलीस यंत्रणा संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे, असं म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी गौरी प्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिलीय. पंकजा मुंडे यांनी पिंपळनेरला जात गौरी गर्जे पालवे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करत अनंत गर्जेला पाठीशी घालणार नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

अनंत गर्जे हा पंकजा मुंडेंचा पीए होता, त्यामुळे गौरी गर्जे प्रकरणाला मोठं वलय निर्माण झालंय. गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्यानंतर पंकजा मुंडेंनी त्यात हस्तक्षेप केला नाही. तसेच घटनास्थळी दुसऱ्या एका पीएला पाठवल्यानं वेगवेगळ्या चर्चा घडू लागल्या होत्या. त्यावरून पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. दुपारी मृत गौरी गर्जे यांच्या वडील आकाश पालवे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

त्यात त्यांनी गौरी आत्महत्या करणारी नव्हती. तिला न्याय द्या. तपास निरपक्षपणे करा,अशी मागणी केली. त्यानंतर संध्याकाळी पंकजा मुंडे यांनी आशोक पालवे यांची भेट घेतली. यावेळी गौरीच्या आई आणि वडिलांनी फोडला टाहो. त्यांनी रडत रडत आपल्या मुलींना न्याय मिळावा अशी मागणी पंकजा मुंडे यांच्याकडे केली. दरम्यान तेथील परिस्थिती पाहून पंकजा मुंडे यांना देखील रडू आलं.

पोलिसांना फोन का केला नाही?

अनंत गर्जे हा पंकजा मुंडे यांचा पीए असल्यानं या प्रकरणाला मोठं वलय निर्माण झालंय. पंकजा मुंडे गौरी गर्जे प्रकरणात आपली भूमिका मांडत नाही, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. त्यांच्यावर टीकादेखील केली जात होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. माझ्याकडे १० पीए ३६ जणांचा स्टाफ आहे. कोण मनातून कसं असेल हे सांगता येत नाही. अनंत गर्जे प्रकरणी आपल्याकडे कोणतीच तक्रार नव्हती.

कर्मचाऱ्यांच्या घरात काय सुरू मला कसं कळणार. तो असा असेल याची आपल्याला कल्पना नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. गौरीने आत्महत्या केल्यानंतर त्यांनी पोलिसांना आदेश का दिले नाहीत, यावरूनही पंकजा मुंडे यांना प्रश्न केले जात होते, त्याबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, माझा हस्तक्षेप नको म्हणून मी पोलिसांना एकही फोन मी केला नाही. ना त्या ठिकाणी एकही कार्यकर्ता गेला. पण तपास एका दिवसात होत नाही. पोलिसांना तपास करू द्या. मी अनंतला पाठीशी घालणार नाही, असं आश्वसन पंकजा मुंडे यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT