प्रजासत्ताक दिनी भाषणात गिरीश महाजनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं सुरू झालेल्या वादाची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. आता या वादाचा नवा अंक सुरू झालाय. गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यभरात आंबेडकरप्रेमी रस्त्यावर उतरलेत.
हा वाद आणखीच पेटल्यानं महाजनांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय. मात्र आपण दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही आपल्या राजीनाम्याची मागणी करणं आणि अॅट्रोसिटी दाखल करा म्हणणं यात राजकारण असल्याचं महाजनांनी म्हटलंय. त्यानंतरही प्रकाश आंबेडकरांनी मंत्रिपदावरून महाजनांच्या हकालपट्टीची मागणी केलीय.
आता हा वाद फक्त नाशिकपुरताच मर्यादित राहिला नाही. तर बारामतीतही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नसल्यानं आंबेडकर प्रेमींनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केलीय.
तर धाराशिवमध्येही मुरुम नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नसल्यानं आंबेडकरप्रेमी आक्रमक झालेत.
मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांना आंबेडकरप्रेमींनी जाब विचारला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं धाराशिवमध्येही मुख्याधिकाऱ्यांवर शाईफेक करुन निषेध केलाय. एवढंच नाही तर अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायतीतही आंबेडकरांचा फोटो लावण्यात आला नाही. त्यावरुनही मोठा राडा झाला.
स्पेशल रिपोर्ट : गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची मागणी, आंबेडकरप्रेमी आक्रमक, VIDEO बघा
खरंतर प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात ज्यांनी देशाला घटना दिली.... संविधान दिलं... त्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि उल्लेख कार्यक्रमातून डावलला जात असेल तर हे निश्चितच योग्य नाही..यामुळे अशा चूका पुन्हा होऊ नयेत... यासाठी सरकारने ठोस नियमावली तयार करुन कार्यवाही करण्याची गरज आहे.
ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.