नागपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
रामटेक तालुक्यात जपालेश्वर मंदिराजवळ मामा-भाचीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पारशिवनीतील भागीमहारी तलावात दोन तरुण बुडाले; दोघेही विद्यार्थी होते.
पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी, साम टीव्ही
Nagpur lake drowning incident kills four people including uncle and niece : उपराजधानी नागपूरमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. दोन वेगवेगळ्या झालेल्या घटनेत चौघांनी जीव गमावलाय. जपालेश्वर मंदिर परिसरात तलावात बुडून मामा-भाचीचा मृत्यू झालाय. तर भागीमहारी तलावात बुडून दोन तरुणांचं निधन झालेय. या घटनेनंतर नागपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील जपालेश्वर मंदिर परिसरात तलावात बुडून मामा–भाचीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. १३ वर्षाची हर्षाली विनोद माकडे (भोजापूर-मानापूर) आणि ३३ वर्षाचे अजय वामन लोहबरे (खात) अशी मृतांची नावे आहेत. हर्षाली रबरी ट्यूबच्या मदतीने पोहण्याचा सराव करत होती. ट्यूब निसटल्याने ती पाण्यात बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी मामाने उडी घेतली, पण खोल पाण्यामुळे दोघेही बुडाले.
या घटनेदरम्यान हर्षालीचे वडील तलावाच्या काठावरच उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरू करून दोघांचे मृतदेह बाहेर काढले.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा सूचना फलक नसल्याने तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली.
नागपूर जिल्ह्याचा पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी तलावात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. अविनाश आनंद (२२, नागपूर) आणि संकल्प मालवे (१९, चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत. सहा मित्रांसह फिरायला गेले असताना पोहण्यासाठी पाण्यात उतरले. अविनाश आनंद हा पाण्यात उतरला पण एका क्षणात तो गटांगळ्या खात होता.. त्याला वाचविण्यासाठी संकल्प मालवे यानेही तलावात उडी घेतली. मात्र दोघांनाही पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडाले. अविनाश आनंद हा प्रियदर्शिनी महाविद्यालयात बी.ई. तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. संकल्प मालवे हा सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीचा विद्यार्थी होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.