MAhavitaran Saam TV
महाराष्ट्र

Mahavitaran Strike: संपादरम्यान वीज नसेल अशी भीती बाळगू नये, महावितरण अधिकाऱ्याचं नागरिकांना आवाहन

काही ठिकाणी समस्या आल्या पण त्या सोडवल्या जात आहेत. आज ७५ टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत. २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या जोरावर काम करतो आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन जाधव

पुणे : महावितरण कर्मचाऱ्यांना सुरु केलेल्या तीन दिवसीय आंदोलनाला आज सुरुवात झाली आहे. या आंदोलनाचा सर्वसामान्यांना फटका बसेल असेल असं बोललं जात आहे. मात्र नागरिकांनी संप सुरू आहे म्हणून वीज नसेल अशी भीती बाळगू नये, असं आवाहन पुण्याचे महावितरण प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केलं आहे.

आजपासून महावितरण कर्मचारी संपावर गेले आहेत.या काळात वीजपुरवठा अखंडीत ठेवण्याचं काम महावितरण करत आहे. पुण्यासह इतर भागात कशाप्रकारे काम केलं जातं आहे. आज अनेक ठिकाणी वीज सुरळीत सुरू आहे. काही ठिकाणी समस्या आल्या पण त्या सोडवल्या जात आहेत. आज ७५ टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत. २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या जोरावर काम करतो आहे, अशी माहिती अंकुश नाळे यांनी दिली आहे.

शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा सकाळपासून खंडित होता.अनेक ठिकाणचा या काळात वीजपुरवठा अखंडीत ठेवण्याचं काम महावितरण करत आहे.पुण्यासह इतर भागात कशाप्रकारे काम केलं जातं आहे.अनेक ठिकाणी ट्रेनी कर्मचारी घेऊन काम केलं जातं आहे.आज अनेक ठिकाणी वीज सुरळीत सुरू केला जात आहे.काही ठिकाणी समस्या आल्या पण त्या सोडवल्या जात आहेत, असं देखील नाळे यांनी सांगितलं.

सांगली,सातारा कोल्हापूर भागात थोडा प्रॉब्लेम आला होता.पण त्या ठिकाणी वीज पुरवठा व्यवस्थित करण्याचं काम केलं आहे.पुण्यात ३५० कर्मचाऱ्यांमध्ये सध्या काम केलं जातं आहे.एक शिफ्टला रोजी १२०० ते १२५० कर्मचारी असतात, ते आज 350 आहेत.नागरिकांनी संप सुरू आहे म्हणून वीज नसेल अशी भीती बाळगू नये, उलट नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन अंकुश नाळे यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death News: चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध सिनेनिर्मात्याचं निधन; सेटवरच घेतला अखेरचा श्वास, मनोरंजनविश्वात शोककळा

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघ अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन्हीकडून नावे फायनल

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले शरद पवार...

पूजेतील नारळाला तडा गेल्यास काय संकेत मिळतात? शुभ की अशुभ

Political News: मोठी बातमी! शिंदेंच्या मंत्र्याने घेतली संजय राऊतांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT