नवसाला पावणार्‍या रेणुका देवीची दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; बीडमध्ये खळबळ विनोद जिरे
महाराष्ट्र

नवसाला पावणार्‍या रेणुका देवीची दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; बीडमध्ये खळबळ

बीडच्या देवगावमध्ये नवसाला पावणार्‍या रेणुका देवी मंदिरातील दानपेटीवर पुन्हा एकदा चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

विनोद जिरे

बीड : बीडच्या देवगावमध्ये नवसाला पावणार्‍या रेणुका देवी मंदिरातील दानपेटीवर पुन्हा एकदा चोरट्यांनी (Thieves) डल्ला मारला आहे. मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप (Lock) तोडून आत प्रवेश अन् दानपेटी फोडून आतील रक्कम लंपास केली आहे. यामुळे देवगावसह (Devgaon) परिसरात खळबळ उडाली असून भक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे. (donation box stolen at renuka mata mandir in beed)

बीडच्या (Beed) केज तालुक्यातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या देवगाव येथील नवसाला पावणाऱ्या श्री रेणुका देवीच्या (renuka mata mandir) दान पेटीवर चोरट्यांनी पुन्हा एकदा डल्ला मारला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवीच्या मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी देखील फोडली आहे. या दानपेटीतील रोख रकमेसह दान केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू देखील लंपास करण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

नवस फेडण्यासाठी दूरवरून लोक या ठिकाणी येतात आल्यानंतर बोललेला नवस पैशाच्या रूपाने किंवा दागिन्याच्या रूपाने दानपेटीत टाकत असतात. त्यावर चोरट्यांनी लक्ष ठेवून देवीच्या दान पेटीला लक्ष केले आहे. याअगोदरही या मंदिरातील दानपेटी दोनदा फोडणीत आली आहे. यामध्ये लाखो रुपयांची दानपेटीतील दान सोन्या- चांदीचे दानातील वस्तू चोरीला गेले होते. यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप एकही आरोपीला पकडला गेला नाही. तोच पुन्हा अज्ञात चोरट्यांनी दान पेटी फोडून आतील रोख रक्कम लंपास केली आहे.

याप्रकरणी केज पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मंदिराचे ट्रस्ट जवळपास गेल्या दीड वर्षांपूर्वी तयार करण्यात आल आहे. तर आतापर्यंत ३ वेळा दानपेटी फोडुनही या मंदिरात अद्याप सीसीटीव्ही बसवण्यात आले नाहीत. यामुळे तात्काळ चोरट्यांना अटक करा व मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. अशी मागणी भविकांमधून होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT