अभिजीत देशमुख
डोंबिवली : दुचाकीला कट मारत कर्कश हॉर्न वाजवल्याचा महिलेने जाब विचारला. यामुळे संतापलेल्या तरुणाने महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवली (Dombivli) पूर्व ग्रामीण भागात घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस (Police) ठाण्यात मारहाण करणाऱ्या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)
पीडित तक्रारदार महिला मुलासह ग्रामीण भागातून दुचाकीने जात होती. यावेळी पाठीमागून कारने येणारा तरुण सातत्याने कर्कश हॉर्न वाजवत होता. त्यानंतर या तरुणाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे महिलेच्या पायाला लागले. संतापलेल्या महिलेने तरुणाला जाब विचारला. त्यामुळे महिला व या तरुणामध्ये वाद झाला. याचा राग आल्याने तरुणाने महिलेला लाथा बुक्क्यांनी वेदम मारहाण केली.
महिलेला गंभीर दुखापत
मारहाणीत महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या करणारा नितेश उर्फ गोट्या भोईर या तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.