

सागर निकवाडे
नंदुरबार : वादग्रस्त वक्तव्यामुळे स्वतःला आणि सरकारला अडचणीत आणणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा (Bhagat Shingh Koshyari) अखेर आज राजीनामा मंजूर झाला आहे. राजीनामा मंजूर झाल्यानंतर (Nandurbar) नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (Maharashtra News)
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार व्यक्ती महाराष्ट्रात कुठलाही उच्च पदावर राहू शकत नाही; अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कमलेश चौधरी यांनी दिली. भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी आता रमेश बेंस हे महाराष्ट्राचे राज्यपाल पद स्वीकारणार आहेत.
राज्यपाल भवन भाजप कार्यालय नको
नवीन राज्यपालांनी आपले पदाचे मान ठेवून निष्पक्षपणे कार्य करणे व राज्यपाल भवनाला भाजपच्या कार्यालय होऊ देऊ नये; अशी अपेक्षा नंदुरबार राष्ट्रवादीचे कमलेश चौधरी यांनी व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.