Dombivli crime  saam tv
महाराष्ट्र

Dombivli : बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन देणारी टोळीचा पर्दापाश; पोलिसांची मोठी कारवाई

विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना बोगस कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला पोलिसांनी पर्दापाश केला आहे.

प्रदीप भणगे

Dombivli Crime News : विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना बोगस कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला पोलिसांनी पर्दापाश केला आहे. डोंबिवलीच्या (Dombivli) महात्मा फुले पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. यात एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. तर या टोळीला बोगस कागदपत्र तयार करून देणाऱ्या इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना जामीनासाठी वेळेवर कागदपत्र मिळत नसल्याने या आरोपींची शिक्षा लांबते. अशा आरोपींच्या नातेवाईकांना हेरून त्यांना जामीनासाठी आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देत त्यांच्याकडून २५ ते ३० हजार रुपये उकळणारी टोळी कल्याण न्यायालयाच्या परिसरात कार्यरत असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्याण न्यायालय परिसरात सापळा रचून पोलिसांनी सिद्धार्थ नागवेकर (२९), जस्मित कौर उर्फ डिंपल करतारसिंग गील (२६),ममता अनुपम हजरा (२८), गितिका सागर उदासी (२४) अशा चार आरोपींना अटक केली आहे. तर या आरोपींना बोगस कागदपत्र तयार करून देणाऱ्या दोघांचा शोध सुरू आहे.

उल्हासनगरमध्ये राहणारा सिद्धार्थ नागवेकर हा इतर तीन आरोपींबरोबर बनावट नाव पत्ता वापरून रेशनकार्ड, आधारकार्ड तसेच ग्रामपंचायतीच्या घरपट्टी तयार करून या बनावट कागदपत्रांच्या आधारे कल्याण न्यायालयात आरोपींना जामीन देत असे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ३० हजार रुपयात हे कागदपत्र उपलब्ध करून दिले जात असत. महात्मा फुले पोलिसांनी या आरोपींना कल्याण न्यायालयाच्या आवारातून रंगेहाथ अटक केल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकेकाळी ५ हजार रूपये कमावणारी अभिनेत्री आता आहे करोडोंची मालकीण

OBC Reservation : ओबीसी समाजाला मोठा धक्का! सरकारच्या ४२ टक्के आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

Govinda and Sunita Ahuja Divorce: मी खूप वेळा माफ केले, पण...; पत्नी सुनीतासोबतच्या डिव्होर्सच्या अफवांवर गोविंदाचा मोठा खुलासा

Nashik-Pune Highway ST Bus Accident: नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात बसचा अपघात

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने उद्या काळी दिवाळी साजरी

SCROLL FOR NEXT