Anil Deshmukh : मी कारागृहात ४ वेळा चक्कर येऊन पडलो; अनिल देशमुखांचा कोर्टात युक्तीवाद

चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख हे तुरूंगात चक्कर येऊन पडले होते.
Former Home Minister Anil Deshmukh
Former Home Minister Anil Deshmukh Saam TV

Anil Deshmukh News : 'मी कारागृहात चार वेळा चक्कर येऊन पडलो, माझी तब्येत स्थिर नसून मला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी देण्यात यावी', अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज कोर्टात केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या ताब्यात आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी स्वत: युक्तीवाद केला. (Anil Deshmukh News Today)

Former Home Minister Anil Deshmukh
Beed Crime News : भररस्त्यावरून मुलीचं अपहरण, कॉफी सेंटरमध्ये बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना

चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख हे तुरूंगात चक्कर येऊन पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतल्या (Mumbai) जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत असल्याचीही माहिती समोर आली होती. खासगी रुग्णालयात उपचार आपल्याला उपचारासाठी परवानगी द्यावी अशी मागणी अनिल देशमुख करत आहेत.

दरम्यान, चक्कर येऊन पडल्यानंतर अनिल देशमुखांवर मुंबईतल्या जे जे रुग्णालयात प्राथामिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी कोर्टात युक्तीवाद केला. विशेष बाब म्हणजे स्वत: अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात आपली कैफियत मांडली. (Anil Deshmukh Latest News)

Former Home Minister Anil Deshmukh
Ganeshotsav 2022 : उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं आवश्यक; मुख्यमंत्र्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा

'मी कारागृहात चार वेळा चक्कर येऊन पडलो, माझी तब्येत स्थिर नसून मला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी देण्यात यावी', असा युक्तीवाद अनिल देशमुख यांनी केला. मात्र या संदर्भात न्यायधीश राहुल रोकडे यांनी अनिल देशमुख यांना कोर्टात लेखी अर्ज सादर करा असा सल्ला दिला.

त्यानंतर अनिल देशमुख यांच्या वतीने लेखी अर्ज सादर करण्यात आला. दरम्यान, या अर्जावर 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी देखील अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता . मात्र त्यावेळी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचाराची परवानगी नाकारत जे जे रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com