Dombivili News Saam tv
महाराष्ट्र

Dombivili Traffic Solution: डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर डी कंजेक्शनचा प्लान

Dombivili News डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर डी कंजेक्शनचा प्लान

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख

Dombivili Traffic Solution: डी कंजेक्शनचा प्लान

ठाणे डोंबिवलीला जोडणारा डोंबिवली खाडीवरील मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन महिन्यात हा पूल वाहतूकीसाठी खुला केला जाणार आहे. मात्र या पूलामुळे (Dombivili) डोंबिवली पश्चिमेत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी डी कंजेक्शनचा प्लान तयार करण्यात आला असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. (Live Marathi News)

डी कंजेक्शन प्लान तयार करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि एमएमआरडीएच्या अधिकार्यानी एकत्रित नियाेजन केले आहे. दीवा वसई मार्गावरील मोठा गाव ठाकूर्ली येथे रेल्वे फाटक आहे. हे फाटक बंद होणार आहे. त्याठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या उड्डाणपूलाचे काम येत्या दिवाळीत सुरु केले जाईल. या उड्डाणपूलाचे काम सात- आठ महिन्यात पूर्णत्वास येणार आहे. त्याच्या भूसंपानाकरीता निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर झाल्याने भूसंपादनाची प्रक्रिया लवकर मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर मोठा गाव ठाकूर्ली -माणकोली खाडी पूलाजवळून कल्याण रिंग रोड जात आहे. 

मोठा गाव ठाकूर्ली ते कल्याण (Kalyan) दुर्गाडी हा रिंग रोड प्रकल्पाचा तिसरा टप्पा आहे. या तिसऱ्या टप्प्याच्या कामाची निविदा एमएमआरडीएने प्रसिद्ध केले आहे. निविदा मंजूर होताच या रिंगरोडच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु केले जाणार आहे. याशिवाय मोठा गाव ठाकू्र्ली ते कोपर हा १८ मीटरचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता एमएमआरडीएकडून केला जात आहे. रेल्वे उड्डाण पूल झाल्यावर माणकोली खाडी पूलावरुन येणारी वाहने ही जुनी डोंबिवली आणि देवीचा पाडा या दिशेने जाऊ शकतात. या विविध उपाययोजना करण्यात आल्या असून खाडी पूल खुला होण्यापूर्वीच पूलामुळे डोंबिवली पश्चिमेत वाहतूक कोंडीचा सामना कराव लागू शकतो, अशी आवई विरोधकांकडून उठविली जात आहे. त्याचे म्हात्रे यांनी खंडन करीत डी कंजेक्शन प्लान हा वाहतूक कोंडीवर तोडगा असल्याचे स्पष्ट केले आहे. खाडी पूल करताना त्याठिकाणी पूलाखालून जलवाहतूक करता येण्याइतके अंतर सोडण्यात आले आहे. भविष्यात कल्याण ते ठाणे हा जलवाहतूकीचा मार्ग सुरु होणार आहे. त्यासाठी ही उपाययोजना आधीच करण्यात आली आहे याकडेही म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT