Dombivali Crime Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime : डोंबिवलीतील हत्येचा उलगडा; सुपारी दिल्याच्या संशयातून ब्रोकरला संपविले, एका संशयितास घेतले ताब्यात

Dombivali News : डोंबिवली जवळील उंबरली गावात राहणाऱ्या संजय भोईर यांचा मृतदेह गावाजवळील रस्त्यावर सापडला होता. संजय भोईर याची कोणीतरी धारदार शास्त्राने हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले होते

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डोंबिवलीच्या उंबरली गावाजवळ एका प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या करण्यात आली होती. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासात या हत्येचा उलगडा करत संशयित आरोपीस अटक केली आहे. जीवे ठार मारण्याची सुपारी दिल्याच्या संशयातून ब्रोकरची हत्या करण्यात आल्याचा उलगडा झाला आहे. 

डोंबिवली (Dombivali) जवळील उंबरली गावात राहणाऱ्या संजय भोईर यांचा मृतदेह गावाजवळील रस्त्यावर सापडला होता. संजय भोईर याची कोणीतरी धारदार शास्त्राने हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत संजय भोईर यांच्या हत्या कोणी व का केली? याचा तपास पोलिसांनी सुरू केला. या हत्याचा उलगडा करण्यासाठी एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांनी या प्रकरणासाठी तीन पथक नेमले. पोलीस (Police) पथकाने तपास सुरू केला. 

मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) ४८ तासाच्या आत खुनाचा उलगडा करत संशयित आरोपी विकास पाटील याला बेड्या ठोकल्या आहेत. तर विकासाचा साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केला. याबाबत माहिती देताना एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी डोंबिवली उंबरली परिसरातील वनविभागाच्या जागेसाठी संजय भोईर आणि विकास पाटील यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान विकास पाटील याला संशय होता की, संजय भोईर यांनी त्याला संपवण्यासाठी सुपारी दिली आहे. या संशयावरून विकास यांनी संजय भोईर याची हत्या करण्याचा कट रचला. शुक्रवारी रात्री संजय भोईर गावात येत असताना विकास पाटील याने मित्रासोबत मिळून गावाजवळ गाठले. त्यानंतर त्याचावर धारदार शस्त्राने वार केले. डोक्यात आणि पायात झालेल्या गंभीर जखमांमुळे संजय भोईर यांच्या जागीच मृत्यू झाला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT