मालकाला शेतीकामात मदत करतो 'राजा' कुत्रा  saam tv
महाराष्ट्र

मालकाला शेतीकामात मदत करतो 'राजा' कुत्रा

कुत्र्याला आपली भाषा कळतेय हे शुभमच्या लक्षात आल्यानंतर त्याने कुत्र्याला चेंडू, दोरी, असे साहित्य आणून देण्याचेही शिकवले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत नागणे

पंढरपूर (Pandharpur) : कुत्रा (Dog) हा ईमानी प्राणी म्हणून ओळखला जातो. मालकाच्या घराची आणि घऱातील माणसांची रखवालदारी करण्याचे काम तो स्वामीनिष्ठेने पार पाडत असतो.अशाच राजा (raja) नावाच्या प्रामाणिक कुत्र्याची करमाळा तालुक्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राजा कुत्रा चक्क कानिफनाथ दुधे (kanifnath dudhe) या शेतकऱ्याला शेती कामात मदत करतोय. ऐवढेच नाही तर घरातील लहान मुलांची तो गाडीतून सफर देखील घडवतोय.

करमाळा तालुक्यात पांडे गावात कानिफनाथ दुधे यांची शेती आहे. शेतीच्या मशागतीसाठी ते पारंपारिक बैलांसह अत्याधुनिक शेती अवजारांचाही वापर करतात. पाच वर्षापूर्वी त्यांचा मुलगा शुभम याने गावरान कुत्र्याचे पिल्लू घरी आणले. लहानपणापासूनच शुभमला कुत्र्याची आवड होती. तो त्याच्याबरोबर खेळायचा, त्यातूनच कुत्र्याला शुभमचा लळा लागला. शुभम सांगेल तो कामे करु लागला. कुत्र्याला आपली भाषा कळतेय हे शुभमच्या लक्षात आल्यानंतर त्यांने कुत्र्याला चेंडू, दोरी, असे साहित्य आणून देण्याचेही शिकवले. त्यातूनच त्याने राजा हे नामकरण केले. आता राजा आणि शुभमची चांगली गट्टी जमली आहे. राजा कुत्रा पाच वर्षाचा झाला आहे तर शुभम हा ननवीत गेला आहे.

सध्या लाॅकडाऊन आहे. शुभमही घरी बसून आॅनलाईन शिक्षण घेत आहे. यातूनच शुभमला एक आडीया सुचली. राजा कुत्र्यासाठी सायकलच्या दोन चाकांचा वापर करुन एक छोडी गाडी तयार केली. या गाडीतून राजा कुत्रा रोज जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा शेतातून घरी आणून देण्याचे काम करत आहे. याशिवाय इतर वेळी घरातील लहान मुलांनाही तो गाडीतून सफर घडवतोय. राजाच्या या कामाचे परिसरात कौतुक होत आहे. एखाद्या पाळीव प्राण्याला माणसाप्रमाणे लळा लावला तर तो ही तितक्याच इमाने इतबारे आपल्या मालकाला प्रमाणिकपणे मदत करतो हेच राजाच्या कामातून दिसून आले आहे.

राजा हा आमच्या घरातील सदस्य झाला आहे. रोज त्याला सोबत घेवूनच जेवण करतो, माणसा प्रमाणे आम्ही त्याला जपतो, तोही सांगेल तो कामे करतोय एकाद्या प्राण्यावर दया दाखवली तर तो ही प्राणी आपल्या मदत करतो असेही शुभम दुधे सांगतो.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Sunday Horoscope : आज 'या' राशींना मिळणार मोठी संधी; कामाचा ताण होणार कमी, वाचा रविवारचे राशीभविष्य

Weather Update : ऊन-सावल्यांचा खेळ अन् विजांचा कडकडाट! महाराष्ट्रातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या आजचे हवामान

Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका लहान मुलांमध्ये का वाढतोय? 'या' ६ कारणांकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर...

पेपरफुटीच्या घटनांनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

SCROLL FOR NEXT