Chandrakant Patil Saam TV
महाराष्ट्र

राज्य सरकारलाच हिंदू-मुस्लिम दंगे व्हावेत असं वाटतंय का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

'राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मात्र आम्ही OBCच्या पाठीशी'

संभाजी थोरात

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या सरकारला नेमकं काय झालं आहे. राज्य सरकारलाच हिंदू मुस्लिम दंगे व्हावेत असं वाटतय का ? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले प्रशासन परवानगी घ्या आणि भोंगे लावा म्हणत आहे. राम मंदिराच्या विषयातही मुस्लिम समाजाजाने सामंजस्य दाखवलं आहे. तसच सामंजस्य इम्तियाज जलील दाखवत आहेत. तरीही शासन असं का करत आहे. राज्य सरकारलाच हिंदू-मुस्लिम दंगे व्हावेत असं वाटतंय का ? हे सरकार आहे ते जातीजातीत धर्माधर्मात वाद निर्माण करत असल्याचा गंभीर आरोपही पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

दरम्यान, आज न्यायालयाने सरकारल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्यास सांगितलं आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, 'हे सरकार ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) काम करत नाही. त्यामुळे आता ओबीसीं शिवाय निवडणूका घ्याव्या लागणार असून राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मात्र आम्ही OBCच्या पाठीशी असून ओबीसींच्या आरक्षित जागांवर भाजपा OBC उमेदवार उभे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे देखील पाहा -

तसंच हिंदू देवतांची भोंगे ही पंरपरा नाही. राज ठाकरे यांचा मुद्दा भोंगे नाही तर तुष्टीकरण हा आहे. मुस्लिमांना एक न्याय आणि हिंदूना वेगळा न्याय असं मतासाठी केलं जातं. बाबरी मशिदीवेळी ही हिंदू समाज लढला तो कधीच थकला नाही. राम मंदिर बांधलंच ५०० वर्षे मुघलांनी राज्य केले म्हणून काय हा देश मुस्लिम झाला असें नाही असं पाटील यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर

Chanakya Niti: कर्ज घेण्यापूर्वी चाणक्यांचे हे 3 नियम जाणून घ्या; वाद आणि आर्थिक संकट टळेल

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पैसे वाटपावरून भाजप पदाधिकारी आणि काँग्रेस उमेदवारामध्ये राडा

Crime News : 'मला माझ्या नवऱ्यासोबत झोपायला भीती वाटते'...; पत्नीची तक्रार, पोलीस बेडरूममध्ये घुसले अन्... नेमकं काय घडलं?

Unique Mangalsutra Designs: मंगळसूत्राचे 5 युनिक डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर उठून दिसतील

SCROLL FOR NEXT