चुकून एसिड प्यायलेल्या २ वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण डॉक्टरांनी वाचवले आहेत. अर्जुन (नाव बदललेलं) या बाळाने नजरचुकीने ॲसिटिक ॲसिड प्यायलं होतं. यामुळे त्या बाळाचं तोंड, अन्ननलिका, छाती, जननेंद्रिय आणि जांघ भाजलं गेलं होतं. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनच्या डॉक्टरांनी या बाळावर त्वरित उपचार केल्याने या त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.
डॉ. मिलिंद जंबगी आणि बालरोग अतिदक्षता विभागाच्या टीमच्या नेतृत्वाखाली या बाळाला साताऱ्याहून पुण्यात सुरक्षितपणे व्हेंटिलेटर सपोर्टवर अंकुरा हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. एंडोस्कोपिक तपासणी आणि चोवीस तास बालरोग अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवल्याने या चिमुकल्याच्या भविष्यातील गुंतागुंत टाळता आल्या.
नोव्हेंबरमध्ये साताऱ्यातील दोन वर्षांच्या अर्जुनसोबत विचित्र प्रकार घडला. त्याने नजरचुकीने ॲसिटिक ॲसिडचं सेवन केलं. हे एसिड सामान्यतः घरगुती साफसफाईसाठी वापरलं जातं. पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत ठेवलेल्या त्या अॅसिडयुक्त द्रवाने त्याचे ओठ, तोंडाची पोकळी आणि अन्ननलिका भाजलं गेलं. याशिवाय त्याच्या छातीवर आणि जांघेत जखमा झाल्या. अर्जुन वेदनेने कळवळत होता. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याचं पाहून त्याचे पालक घाबरले.
अर्जुनला तात्काळ साताऱ्यातील रुग्णालयात नेण्यात आलं. याठिकाणी डॉ. घोरपडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत अर्जुनवर त्वरित उपचारांना सुरुवात केली. यावेळी पुण्यातील डॉक्टरांची टीम साताऱ्याला पोहोचली. त्यांच्या विशेष रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर सपोर्टवर या बाळावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. पुण्यातील अंकुरा रुग्णालयात दाखल झाल्यावर बालरोग अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद जंबगी आणि त्यांच्या टीमने त्यावर योग्य ते उपचार केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.