yavatmal baby, yavatmal news Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal News : कुटुंबियांनी 5 दिवसाच्या बाळास दिले बिब्याचे चटके, डाॅक्टरांचे बाळाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

ग्रामीण भागात आराेग्य यंत्रणा तळागळापर्यंत पाेहचण्यासाठी अधिक प्रयत्न हाेणे गरजेचे बनले आहे.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News : पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून त्याचे चटके देण्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडला. परिणामी बाळाची प्रकृती चिंताजनक बनली असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Breaking Marathi News)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी - पोटदुखीच्या त्रासावर उपाय म्हणून जून्या जाणत्या लाेकांना सांगितलेल्या उपाय म्हणून यवतमाळ जिल्ह्यात एका नवजात बाळाच्या पोटावर बिब्बाचे चटके देण्यात आले.

बाळ जन्मल्यानंतर ते पोटदुखीच्या त्रासाने रडतेय म्हणून जन्मदात्या आई वडिलांनी गावातील जुन्या मंडळींचे ऐकून अंधश्रद्धेचा हा अघोरी प्रकार केला. त्यामुळे बाळाची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली.

6 जूनला (yavatmal) घाटंजी तालुक्यातील पारवा पीएचसीमध्ये प्रसूती झाल्यानंतर आईवडील बाळाला घरी घेऊन गेले. मात्र ते रडतेय म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता जेष्ठ मंडळींनी सांगितलेल्या अघोरी प्रकाराचा प्रयोग केला.

पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून त्याचे चटके दिले. मात्र ह्या अमानवीय प्रयोगामुळे बाळाची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टर या बाळास जीवदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताहेत.

ग्रामीण भागात आराेग्य यंत्रणा असताना देखील केवळ जून्या जाणत्या ज्येष्ठांनी त्यांना माहित असलेल्या गाेष्टी सांगण्यापेक्षा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देणे आवश्यक बनले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT