हॉस्पिटल.... सर्वसामान्यांना मृत्यूपासून वाचण्याचं अंतिम ठिकाण... मात्र आता हेच हॉस्पिटल लुटीचे अड्डे बनलेत.. ज्यांना देवदूत मानलं जातं... तेच रुग्णांचे रक्त शोषणारे गोचिड असल्याचं समोर आलंय..हॉस्पिटलमधील लुटीच्या गोरखधंद्याचं काळं सत्य एका डॉक्टरनेच उघड केलंय..
अनेक डॉक्टरांकडून रुग्णांना अनावश्यक चाचण्या करण्यास सांगितलं जातं.. रुग्णांना गरज नसताना आयसीयूमध्ये ठेवण्यात येतं... यामध्ये गोचिडाने रक्त शोषल्याप्रमाणे हॉस्पिटल,डायग्नॉस्टिक सेंटर्स आणि लॅब यामधून रुग्णांची लूट केली जाते..लुटीची ही एक साखळीच आहे. मात्र डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि सरकारने अनेक कायदे केलेत. या प्रश्नावर वैद्यकीय तज्ञांनी काय म्हटलंय ते पाहूया...
खरंतर ही कट प्रॅक्टिस बेकायदेशीर आहे... मात्र कट प्रॅक्टिस प्रकरणात डॉक्टरांवर काय कारवाई केली जाते? पाहूयात...
कट प्रॅक्टिसची आरोग्य यंत्रणेला वाळवी( HEADER)
रुग्णाला डायग्नोस्टिक सेंटर्स, लॅबकडे पाठवण्यासाठी कमिशन
कमिशनसाठी अनावश्यक चाचण्या, उपचार करणं बेकायदेशीर
डॉक्टर दोषी आढळल्यास परवाना रद्द करण्याची तरतूद
1 वर्षांचा तुरुंगवात आणि 50 हजार दंडाचीही तरतूद
200 पैकी 60 डॉक्टरांवर कट प्रॅक्टिस प्रकरणी कारवाई
इंडियन मेडिकल असोसिएशनकडे कट प्रॅक्टिसची तक्रार केल्यानंतरही बोटावर मोजण्याइतक्या प्रकरणात कारवाई होते. त्यामुळे लुटीची ही साखळी कायमची नेस्तनाबूत होणे गरजेचे आहे. हॉस्पिटलला लुटीचा अड्डा बनवणाऱ्या आणि कट प्रॅक्टिसवर पोट भरणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईसाठी कठोर कायदा बनवण्याची गरज आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.