Abdul Sattar
Abdul Sattar Saam TV
महाराष्ट्र

Abdul Sattar: दारू पिता का? अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात कृषीमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा, व्हिडिओ व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

बीड : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपल्याला मदतीचा हात द्यावा अशी माफक अपेक्षा आहे. सरकारकडूनही नुकसानग्रस्त भागाचे पाहणी दौरे सुरु झाले आहेत. मात्र हे दौरे पर्यटन दौरे तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) अतिवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर चक्क दारूच्या गप्पा मारताना दिसत आहे. त्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. (Latest News Update)

कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचे वादग्रस्त वक्तव्य

अतिृष्टीची पाहणी करायला आलेल्या कृषीमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकारी यांना विचारले की तुम्ही दारु घेता का? जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर देत कधी कधी थोडी घेतो म्हटलंय. यामुले मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा दुःखाचा विसर पडतोय का? असा प्रश्न निर्माण झालाय. अतिवृष्टीने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या कृषीमंत्र्यांविरोधात बीडमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेसची टीका

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना प्रश्न विचारला की, अतिवृष्टी पाहणी दौरा की मद्यसृष्टी पाहणी दौरा? यावेळी त्यांनी एक शेर देखील ट्वीट केला आहे.

पंचनाम्यानंतर कॅबिनेटमध्ये मदतीचा निर्णय

पंचनाम्यानंतरच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हेक्टरी 75 हजार रुपयांची मागणी केली आहे. मात्र अद्याप संपूर्ण पंचनामे झाले नसून पुढच्या एक आठवड्यात संपूर्ण पंचनामे होतील. त्यानंतर जिल्ह्याजिल्ह्यातून त्याचा अहवाल येईल आणि कॅबिनेटमध्ये या सर्व बाबी मांडण्यात येतील. त्यानंतरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतील, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

Chandrahar Patil : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत पराभव कोणी केला?; चंद्रहार पाटील यांनी केला गौप्यस्फोट

Drinking Milk: रात्री झोपण्यापूर्वी दूध का पिऊ नये?

Covid Vaccine Certificate: कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील PM मोदींचा फोटो गेला कुठं?, समोर आलं कारण

SCROLL FOR NEXT