महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर
राज्य सहकारी बँकेचा १४.२५ टक्के बोनस जाहीर करण्यात आला
बँक कर्मचाऱ्यांना सरासरी ८१ हजार ५१५ रुपयांचा बोनस मिळणार
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या बँकेच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी दणक्यात साजरी होणार आहे. राज्य सहकारी बँकेकडून कर्मचाऱ्यांना १४.२५ टक्के दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांना किमान ५७ हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. दिवाळी बोनस जाहीर होताच बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांसाठी भरघोस बोनसची घोषणा केली आहे. यंदा बँकेच्या कर्मचाऱ्यांना १४.२५ टक्के बोनस मिळणार आहे. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना किमान ५७ हजार रुपये, कमाल ५ लाख ३६ हजार रुपये तर सरासरी ८१ हजार ५१५ रुपयांचा बोनस मिळणार असल्याची माहिती राज्य बॅंकेचे प्रशासक यांनी दिली.
राज्य सहकारी बँकेने मर्यादित मनुष्यबळाच्या जोरावर लक्षवेधी आर्थिक प्रगती साध्य केली आहे. पूर्वी बँकेत ३ हजार ४१५ कर्मचारी कार्यरत असताना बँकेचा एकूण व्यवसाय ५ हजार ६१२ कोटी रुपये इतका होता. मात्र, सध्या केवळ ७७७ कर्मचारी कार्यरत असून बँकेने ५६ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. आधुनिक कार्यपद्धती, कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन यामुळे हे शक्य झाल्याचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.