या ७ जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली  Saam Tv
महाराष्ट्र

या ७ जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यावर राज्यामधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Corona update : कोरोना Corona रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यावर राज्यामधील निर्बंध Restrictions शिथिल करण्याचा निर्णय ठाकरे Thackeray सरकारने घेतले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत पुण्यासह Pune राज्यामधील या ७ जिल्ह्यांनी महाराष्ट्राची Maharashtra खूप चिंता वाढवली आहे. या जिल्ह्यांचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यापेक्षा जास्त प्रमाणात दिसून आला आहे.

या जिल्ह्यांत पुणे, Satara सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अहमदनगर आणि सिंधुदुर्ग Sindhudurg या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. नव्या विश्लेषणानुसार या सात जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात आहे. ४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या आठवड्यामध्ये राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट घसरुन हा ३.०५ टक्के इतका झाला आहे. २८ जुलै ते ३ ऑगस्ट या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट हा ३.५१ टक्के इतका होता.

हे देखील पहा-

४ ते १० ऑगस्ट या आठवड्यामध्ये पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ५.८१ टक्के इतका झालेला होता. तर त्या अगोदरच्या आठवड्यामध्ये पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ६.३८% इतका होता. अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यात ४ ते १० ऑगस्ट या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ५.२७% टक्के इतका होता. तर त्याअगोदरच्या आठवड्यात नगरचा पॉझिटिव्हिटी रेट हा ५.९८% इतका होता.

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या आठवड्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सध्या घट झालेली आहे. मात्र, राज्याच्या सरासरी रेटपेक्षा ते जास्तच आहे. सातारा आणि सांगली Sangali जिल्ह्याच्या आठवड्याच्या पॉझिटिव्हिटी रेट मध्येही घसरण बघायला मिळात आहे. ४ ते १० ऑगस्ट या आठवड्यामध्ये सांगली आणि सातारऱ्याचा पॉझिटिव्हिटी रेट अनुक्रमे ६.६३% आणि ६.१२% इतका होता.

तर त्याअगोदर आठवड्यात त्यांचा पॉझिटिव्हिटी रेट अनुक्रमे ७.५९% आणि ६.४७% इतका होता. सोलापूरचा या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३.४% तर बीड जिल्ह्याचा हा ४.२४% इतका आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अहमदनगर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त प्रमाणात आहे. दरम्यान, केंद्राने नुकतेच राज्यामध्ये ३७ जिल्ह्यात गेल्या २ आठवड्यामध्ये रोजची कोरोना रुग्णसंख्या ही वाढत असल्याने, चिंता व्यक्त केलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रामधील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

अहमदनगर आणि उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यांची रोजची रुग्णवाढ जास्त होत असल्याचे राज्याच्या कोरोना आकडेवारीवरुन दिसत आहे. राज्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. आतापर्यंत एकूण ६५ रुग्णांची नोंद राज्य आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली आहे. बुधवारी आयजीआयबी प्रयोगशाळेने आजून २० डेल्टा प्लस रुग्णांची नोंद केलेली आहे. यामुळे, ही संख्या ६५ वर पोहोचलेली आहे. रत्नागिरी मधील १ मृत्यु वगळता डेल्टा प्लस रुग्णांत आजाराचे स्वरुप सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

SCROLL FOR NEXT