कोरोना चाचण्या वाढवून पॉझिटिव्हिटी रेट कमी करा : अमित देशमुख

Amit D
Amit D
Published On

लातूर : जिल्ह्याचा District कोरोना Corona पॉझिटिव्हिटी Positivity रेट Rate दहा टक्के पेक्षा खाली आलेला आहे. परंतु काही तालुक्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा दहापेक्षा अधिक आहे. त्यामुळे सर्व तहसीलदार यांनी त्यांच्या तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी येण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. Reduce Positivity Rate By Increasing Corona Tests: Amit Deshmukh

प्रत्येक तालुक्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी व पुढील शंभर दिवस कोरोना चाचण्यांची संख्या कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री Guardian Minister अमित देशमुख Amit Deshmukh यांनी दिले आहेत. 

हे देखील पहा -

जिल्हाधिकारी Collector कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. Reduce Positivity Rate By Increasing Corona Tests: Amit Deshmukh

यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे महापालिका आयुक्त अमान मित्तल  यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

लातूर Latur जिल्ह्यात कोरोना ची संख्या कमी होत असून जिल्ह्याचा पॉझिटिव रेट 10 टक्के पेक्षा कमी झालेला आहे. परंतु काही तालुक्यांचा पॉझिटिव्हटी रेट दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असून या तालुक्यांनी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून जास्तीत जास्त संशयीत रुग्णांची Patient तपासणी Testing करावी.

एखाद्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्या गावातील प्रत्येक व्यक्तीची  कोरोना चाचणी  करावी. पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्याचे प्रयत्न करावेत असे त्यांनी सुचित केले आहे.

Edited By : Krushanrav Sathe  
 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com