चितोडा प्रकरणी लवकरच जिल्हास्तरीय आंदोलन ?
चितोडा प्रकरणी लवकरच जिल्हास्तरीय आंदोलन ? संजय जाधव
महाराष्ट्र

चितोडा प्रकरणी लवकरच जिल्हास्तरीय आंदोलन ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा : खामगाव तालुक्यातील चितोडा येथे घडलेल्या घटनेनंतर बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्याचे निवासस्थान मातोश्री व राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या नावाचा हवाला देत जे वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्या संदर्भात राज्य शासनाने किंवा मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातून अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. District level agitation in Chitoda case

हे देखील पहा -

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी व राज्यात निकोप लोकशाहीचे वातावरण असल्याचे दाखवून द्यावे अन्यथा महाविकास आघाडी सरकारची दलितविरोधी भूमिका आहे असा समज होईल. राज्यातील दलित, आदिवासी असुरक्षीत आहे असे समजून येत्या काळात जिल्हाभर मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा समतेचे निळे वादळ संघटनेचे भाई अशांत वानखडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

चितोडा प्रकरणावर स्थानिक पत्रकार भवन येथे विविध दलीत संघटनाच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी भाई अशांत वानखडे म्हणाले की, चितोडा येथे घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी कोबींक ऑपरेशन सुरू केले. वास्तविक कोणी गुन्हा केला असेल तर पोलिसांनी त्यांचेवर नियमानुसार गुन्हे दाखल करावे.

मात्र दगडफेक करणार्‍या लोकांवर जर दरोडयाचे गुन्हे पोलिस दाखल करीत असतील तर ही पोलिसांची दडपशाही आहे. सध्या चितोडा गावात भयाचे, दहशतीचे वातावरण आहे. दोन समाजातील हे भांडण होते. रमेश हिवराळे या युवकावर सामुहीक हल्ला करून त्यांच्यावर अनेक वार करण्यात आले. सध्या तो रूग्णालयात शेवटची घटका मोजत आहे. असे असतांना लोकप्रतिनिधी असणाऱ्या संजय गायकवाड यांनी तेथे जावून मातोश्रीचा हवाला देत वादग्रस्त वक्तव्य करून दहशत पसरविली.

वास्तविकतः सत्तेत बसलेल्यांनी लोकांच्या संरक्षणाची हमी दयायला पाहिजे. कारण आपला कायदा संरक्षणाची हमी देतो. पण कायद्याची अमंलबजावणी करणारेच चुकीचे वागू लागले तर त्यांच्या नियतीवर शंका येते. मातोश्रीचे नाव घेवून कोणी लोकप्रतिनिधी चिथावणीची भाषा करत असेल तर निश्चित हे सरकार न्याय, बंधूभाव, समता निर्माण करण्याचे काम करीत नसून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करून दहशतीचे वातावरण तयार करीत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

तेव्हा सरकारने या संदर्भात खूलासा करावा अशी मागणी करून लवकरच मोठे जिल्हास्तरीय आंदोलन करणार असल्याचे यावेळी अशांत वानखडे यांनी सांगितले. यावेळी भाई सोमचंद्र दाभाडे, भाई कैलास सुखधने, विजय गवई, सोपान देबाजे उपस्थित होेते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT