Jayant Patil NCP
Jayant Patil NCP @Jayant_R_Patil
महाराष्ट्र

सांगली: गरीब विद्यार्थ्यांना 'टॅब'चे वाटप; मंत्री जयंत पाटील आणि अ‍ॅमेझॉन इंडियाचा संयुक्त उपक्रम

साम टिव्ही

सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील गरीब विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या संयुक्त विद्यामाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. जयंत दारिद्र्य निर्मुलन योजनेच्या माध्यमातून हे टॅब (Tablet PC) विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आले. जयंत पाटील (Jayant Patil) यांचे सुपुत्र प्रतिक पाटील आणि जयवर्धन पाटील यांनी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रमा राबवण्यात आला. (Distribution of 'tabs' to poor students; A joint venture between Minister Jayant Patil and Amazon India)

हे देखील पहा -

कोरोनामुळे (Corona) शाळा आणि महाविद्यालये बंद करावी लागली. अशात ऑनलाईन अभ्यासाला (Online Study) प्राधान्य दिले जात आहे. संगणक, मोबाईल, लॅपटॉप, टॅब या उपकरणांवर विद्यार्थी ऑनलाईन पद्दतीने शिक्षण घेत आहेत. मात्र जे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे मात्र ते विद्यार्था अभ्यासात हुशार आहेत अशा हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत दारिद्र्य रेषेखालील अनेक विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप करण्यात आले. या टॅबमुळे गरीब विद्यार्थ्यांनाही आता ऑनलईन शिक्षण घेता येणार आहे.

नवा कोरा टॅब मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण त्यांना आता शिक्षणासाठी अभ्यासातून वंचित रहावं लागणार नाही. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुले शिकली, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, तर या कुटुंबांच्या अनेक पिढ्यांचा उध्दार होऊ शकतो. आपण अशी अनके उदाहरणे समाजात बघतो. त्यामुळे आम्ही सुरुवाती पासूनच जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या माध्यमातून दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील मुलांना शिक्षणास सहकार्य व प्रोत्साहन देत आहोत,असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाठी यावेळी प्रतिक जयंत पाटील, अमेझॉन इंडियाचे इंडिया हेड अक्षय कश्यप, लिडरशिप फॉर इक्वेटीचे संस्थापक व सीईओ मधुकर बानूरी, लिडरशिप फॉर इक्वेटीचे जेष्ठ सल्लागार सलील पोळ, प्रा. शामराव पाटील, पी.आर.पाटील, आर.डी. सावंत, संजय पाटील उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

Maharashtra Politics: '...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान

IPL Orange Cap: विराटचा ऑरेंज कॅपवर कब्जा! पाहा टॉप ५ फलंदाज

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

SCROLL FOR NEXT