विजय पाटील
सांगली - वृक्षतोडीमुळे कोरोनाच्या Corona काळात ऑक्सिजनचा Oxygen तुडवडा निर्माण होत आहे. त्यात आज वटपौर्णिमा Vatpoornima हा सण आहे. या निमित्तने सांगलीच्या Sangli इस्लामपूर येथे महिलांना शंभर वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले आणि वडाच्या रोपाचे संगोपन करण्याचे आवाहन मुक्तांगण प्लेय स्कूलच्यावतीने Muktangan Play School करण्यात आले आहे. Distribution of Banyan tree to women
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी न करता आपल्या घरातच वडाच्या रोपाची पूजा करावी. वाटप केलेल्या रोपाचे योग्य संगोपन करून वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करावेत. तर या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे. कोरोना काळात कित्येक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी जीव गेला आहे.
हे देखील पहा -
वटपौर्णिमेचे औचित्य साधून महिला पोलीस अधिकारी, काही महिला मंडळे, महिला संघटनांच्या महिला प्रतिनिधींना ५० वडाची झाडे भेट दिली आहेत. या संस्थेच्या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यात ही झाडे लावली जाणार आहे.महिला पोलीस अधिकारी या पोलीस कवायत मैदानाच्या कडेला झाडे लावून संगोपन करणार आहेत. तर उर्वरित ५० झाडे व्यक्तीगत पातळीवर महिलांना दिली आहेत. या महिला वटपौर्णिमे निम्मित रोपांचे पूजन करतील आणि हे झाड योग्य जागेत लावतील. Distribution of Banyan tree to women
पर्यावरण जागृती व संवर्धनासाठी मुक्तांगण वेगवेगळे उपक्रम राबवित असते. पाच वर्षात २१ हजार सीड बॉल निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले आहेत. वटपौर्णिमेनिम्मित शंभर वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.वडाचे झाड अत्यंत आरोग्यदायी आहे. वडाच्या झाडाला पर्यावरणात महत्त्वाचे स्थान असून, प्राणवायू देणाऱ्या या झाडाचे उपस्थित महिलांना महत्व पटवून देत झाडांचे वाटप करण्यात आले.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.