रिक्षा उभी करण्यावरून वाद, दोघांना मारहाण; पती-पत्नीवर गुन्हा दाखल! प्रदीप भणगे
महाराष्ट्र

रिक्षा उभी करण्यावरून वाद, दोघांना मारहाण; पती-पत्नीवर गुन्हा दाखल!

रिक्षा उभी करण्यावरून झालेल्या वादात रिक्षाचालकाच्या कुटूंबाने दोघा भावांना मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय.

प्रदीप भणगे

डोंबिवली : रिक्षा उभी करण्यावरून झालेल्या वादात रिक्षाचालकाच्या कुटूंबाने दोघा भावांना मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून याप्रकरणी रिक्षाचालक सोनू उपाध्याय व त्याच्या पत्नी विरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

जखमी तरुण सर्वेश दीक्षित (वय 23) याच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवली पश्चिमेतील अशोक भुवन सोसायटीत सर्वेश राहण्यास असून तो एमआयडीसी तील एका कंपनीत कामास आहे. बुधवारी रात्री तो सोसायटीखाली सर्वेश हा भाऊ हर्ष याच्यासोबत उभा होता.

ड्रायव्हरने वडिलांची रिक्षा नीट पार्क केली का हे पाहण्यासाठी हर्ष गेला असता तेथे रिक्षाचालक सोनू हा आला. येथे रिक्षा का पार्क केली यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. सोनू व त्याच्या कुटूंबियांनी सर्वेशला लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Aamir Khan : बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी एकाचवेळी २५ आयपीएस अधिकारी धडकले, नेमकं प्रकरण काय?

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT