Shivsnera Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO : रत्नागिरीत ठाकरे-शिंदे गटामध्ये जोरदार राडा, शिंदे गटाचे कार्यकर्ते ठाकरे गटाच्या शाखेत घुसले, अन्...

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे शाखेत घुसून ताब्यात घेतली.

साम टिव्ही ब्युरो

>> जितेश कोळी

रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर शिंदे गटात जल्लोष होत आहे तर ठाकरे गटात निराशा पसरली आहे. मात्र दापोलीत दोन्ही गट एकमेकांशी भिडले आहेत.

ठाकरे आणि शिंदे गटामध्ये दापोलीत जोरदार राडा झाला आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे शाखेत घुसून ताब्यात घेतली.

योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेत घुसून गोंधळ घातला. शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेत घुसले होते. यावेळी ठाकरे-शिंदे गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. (Political News)

यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. शिवसेना पक्ष चिन्ह आम्हाला मिळाले आहे, त्यामुळे शिवसेना शाखा आमचीच आहे, असं म्हणत शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबादी करत जोरदार राडा घातला.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दापोलीत सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दापोली तणावाचे वातावरण असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

SCROLL FOR NEXT