उस्मानाबाद जिल्हा परिषदेत अधिकारी अन सदस्यांमध्ये वाद!  SaamTv
महाराष्ट्र

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत अधिकारी अन सदस्यांमध्ये वाद!

उस्मानाबाद जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि सदस्यांमध्ये चांगलाच वाद रंगला असून अधिकारी दोन टक्के कमिशन घेतल्याशिवाय कामे करत नाहीत असा आरोप सदस्यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि सदस्यांमध्ये चांगलाच वाद रंगला असून अधिकारी दोन टक्के कमिशन घेतल्याशिवाय कामे करत नाहीत असा आरोप सदस्यांनी केला आहे.

जि.प.सदस्य ज्ञानेश्वर गीते आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांच्यामध्ये मागील आठवड्यात चांगलाच वाद झाला होता. यातून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळया फिती लावत एक दिवसीय आंदोलन केले होते व गीते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

हे देखील पहा -

मात्र, आता जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गीते यांनी देखील या अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. माझ्या विरोधात करण्यात आलेले आंदोलन पूर्णपणे चुकीचे असून मी त्यादिवशी झालेल्या सर्व भांडणाचे रेकॉर्डिंग केले आहे असे म्हणत सर्व अधिकारी भ्रष्टाचारी आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

गीते यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून, दोन टक्‍क्‍यांनी पैसे मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीसीटीव्ही देखील या अधिकाऱ्यांनी बंद करण्यात आले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच जिल्हा परिषदेमध्ये कुठल्याही कामासाठी दोन टक्के कमिशनचे पैसे घेतल्याशिवाय अधिकारी कसलेच काम करत नसल्याचा आरोप ज्ञानेश्वर गीते यांनी केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शंकर महाराज अंगात येतात' पुण्यातील दांपत्याची फसवणूक; कुटुंबाची १४ कोटी रुपयांची फसवणूक

Badlapur News : निवडणुकीच्या घोषणेआधीच बदलापूरला मोठी भेट, २४० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर, जीआर पण काढला

Maharashtra Live News Update: किरकोळ वदातून महिलेने केली चार चाकी वाहनांची तोडफोड

Amruta Khanvilkar Photos: अमृता खानविलकरचा स्टायलिश अंदाज, नजरेने केलं खल्लास

Bhakri Tips: भाकरी लगेच कडक होते? पिठात घाला फक्त १ चमचा 'हा' पदार्थ, दिवसभर राहील मऊ

SCROLL FOR NEXT