Eknath Khadse and Girish Mahajan Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: खडसे-महाजन वाद मिटणार? मध्यस्थीसाठी केंद्रीय मंत्री मैदानात

Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. पण आता खडसे-महाजन वाद मिटवण्यासाठी थेट केंद्रीय मंत्री मैदानात उतरले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

एकनाथ खडसे भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होऊन महिने उलटले मात्र अद्याप खडसेंचा भाजप प्रवेश झालेला नाही. एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नक्की कधी होणार? यावर एकनाथ खडसेंच्या सूनबाई आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आता भाष्य केलंय.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे एकाच राजकीय मुशीतून तयार झालेले दोन मोठे नेते. मात्र दोघांमध्ये विळ्या-भोपळ्याचं नातं 2014 नंतरच्या राज्यातील राजकारणात खडसेंभोवती राजकीय फास अधिक घट्ट होत गेला. त्यातून त्यांच्यावर बरेच आरोप झाले. इतके की खडसेंनी 2020 मध्ये भाजपची 40 वर्षांची साथ सोडली आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. आता पुन्हा खडसे भाजपवासी होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन संघर्षाची सुरुवात कधी झाला, हे जाणून घेऊ...

खडसे-महाजन वादाचा इतिहास

मिळालेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये राज्यात युतीची सत्ता आली. एकनाथ खडसेंना 16 मंत्रीपदं मिळाली. यानंतर खडसेंना भाजपतूनच विरोध सुरु झाला. त्यासाठी महाजनांना बळ देण्यास सुरुवात झाली, असं बोललं जातं. सत्तेच्या वादातूनच खडसे-महाजन संघर्ष टोकाला गेला. 2020 मध्ये खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यानंतर एकनाथ खडसेंनी महानंदा, सहकारी बँकेवरचं वर्चस्व गमावलं. 2024 मध्ये खडसे पुन्हा भाजपत येण्यासाठी प्रतिक्षेत आहेत.

एकनाथ खडसेंनी ऐन निवडणुकांआधी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. खरंतर राष्ट्रवादीकडून खडसे लोकसभेचे उमेदवार होते. मात्र त्यांनी भाजपत परतण्याची घोषणा केली आणि रक्षा खडसेंच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं. तेंव्हापासून खडसेंचा प्रवेश रखडलाय. त्याला भाजपतील एका गटाचा विरोधही असल्याच्या चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात रंगल्यात. त्यामुळे हा विरोध आता रक्षा खडसेंच्या मध्यस्थीनं शमतो का हे पाहावं लागेल.

दरम्यान, रक्षा खडसे तिसऱ्यांदा रावेर मधून निवडून आल्या असल्यातरी एकनाथ खडसेंनी संकटमोचक कमी पडले म्हणत महाजनांना टोला लगावला. जळगावच्या राजकारणातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये रंगलेला हा राजकीय संघर्ष रक्षा खडसेंमुळे तरी शमणार का की खडसे-महाजन वादात खडसेंना सक्तीचा राजकीय संन्यास पदरी पडतो हेच पाहायचं. यावर खान्देशातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं गणित अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premachi Goshta 2: एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची गोष्ट २’ चा हटके टीझर प्रदर्शित!

Beetroot Rice Recipe : चायनिज कशाला? घरीच करा बीटाचा चमचमीत राईस

थरारक! कोसळलेल्या पुलावरून विद्यार्थ्यांचा जावघेणा प्रवास; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील

Shivali Parab Saree Look: 'ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी...' हिरव्या साडीतलं शिवालीचं सौंदर्य पाहून हेच म्हणाल...

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

SCROLL FOR NEXT