Nitesh Rane Saam TV
महाराष्ट्र

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट! भाजप नेते नितेश राणेंची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून नोटीस

Nitesh Rane will be investigated in Disha Salian death case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे.

Gangappa Pujari

गणेश कवाडे| मुंबई, ता. ११ जुलै २०२४

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे.  दिशा सालियन मृत्यू प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतची एक्स मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांना नोटीस बजावली असून याप्रकरणात त्यांचीही चौकशी होणार आहे.

आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा राणे यांनी केला होता. तसेच आपल्याकडे पुरावे असल्याचेही राणे म्हणाले होते. त्यानंतर आता याप्रकरणी नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, दिशा सालियान प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत. त्या हिंदू मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाला. याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, सीसीटिव्ही फुटेज, रजिस्टरचे कागद फाडण्यात आले. मी पोलिसांना सगळी माहिती देण्यासाठी तयार आहे. मी मुंबई पोलीस आणि SIT समोर सगळे पुरावे देणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

Maharashtra Politics: वाजलं म्हणून महायुतीचं लगेच काही तुटत नाही…|VIDEO

Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT