Disha Salian aditya thackeray rhea chakraborty.jpg Saam Tv
महाराष्ट्र

Disha Salian Death Case : आदित्य-रियामध्ये ४४ वेळा फोन कॉल? माजी खासदाराच्या दाव्यानंतर याचिकेतही उल्लेख

Disha Salian : माजी खासदार राहुल शेवाळे यांनी ३ वर्षांपूर्वी या प्रकरणी एक मोठा खुलासा केला आहे. या खुलाश्यात जी गोष्ट म्हटली गेली होती, तीच गोष्ट दिशाच्या वडिलांच्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आली आहे.

Yash Shirke

Disha Salian Case Update : माजी खासदार राहुल शेवाळे यांनी ३ वर्षांपूर्वी संसदेमध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंबंधित प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी त्यांनी दिशा सालियन आणि अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या कालावधीत आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या फोनवर ४४ वेळा संभाषण झाल्याचे म्हटले होते. आता दिशाच्या वडिलांनीही या संबंधित याचिकेमध्ये उल्लेख केला आहे.

सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. ८ जून २०२० रोजी तिचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये पोलिसांनी तिच्या मृत्यूची चौकशी बंद केली. आता ५ वर्षांनंतर दिशाच्या वडिलांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असे याचिकेमध्ये म्हटले आहे.

दिशाची हत्या करण्यात आली आहे असे दिशाच्या वडीलांनी, सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता सूरज पांचोली आणि अभिनेता डिनो मौर्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर आदित्य आणि रिया यांच्या ४४ वेळा फोनवर संभाषण केल्याचा आरोप सतीश सालियान यांनी केला आहे.

'दिशावर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. दिशा खूप महत्त्वाकांक्षी होती. ती आत्महत्या करुच शकत नाही. माझ्या मुलीचा मृत्यू दुर्घटना असल्याचे मला सांगण्यात आले. त्यावेळेस माझ्या कुटुंबियांवर दबाव होता. आम्ही एका प्रकारे नजरकैदेत होतो. आमच्या प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर होती', असे सतीश सालियान यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, भारताने दिला मदतीचा हात

Mumbai Protest: जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच सरकारकडून झटका? मुंबईत आंदोलनासाठी नवे नियम जारी

Bhau Kadam Natak: भाऊ कदम पुन्हा रंगमंच गाजवणार; 'पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची' नाटकाचा लवकरच शुभारंभ

नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार; 100 हून अधिक भारतीय पर्यटक बेपत्ता, हेल्पलाइन क्रमांक जाहीर

भाजप नगरसेविकेने शाळेची जमीन लाटली; प्रशासनाकडून चौकशी सुरू, सोलापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT