'बैलगाडा शर्यत' दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार : दिलीप वळसे-पाटील SaamTv
महाराष्ट्र

'बैलगाडा शर्यत' दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार : दिलीप वळसे-पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, बेकायदा व विनापरवाना बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी दाखल झालेले सर्व गुन्हे लवकरच मागे घेणार आहे.

रोहिदास गाडगे

मंचर :- राज्यात बैलगाडा शर्यत बंदी विरोधात सर्वच राजकिय पक्षांचे नेते आक्रमक भुमिकेत पाहायला मिळत असताना सांगलीत भाजप नेते व आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली विनापरवाना व बेकायदा बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली. यामुळे पडळकर व त्यांच्या ४१ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करणार आले होते. मात्र, हे सर्व गुन्हे माघारी घेणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले आहे.

हे देखील पहा -

बैलगाडा शर्यतबंदी विरोधात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम देत गृहमंत्र्यांच्याच मतदार संघात बैलगाडा शर्यत घेणार असं जाहिर केलं आणि आज त्यावर ठाम असल्याचे आढळराव पाटलांनी जाहिर करत वळसे पाटलांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, बेकायदा व विनापरवाना बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी दाखल झालेले सर्व गुन्हे लवकरच मागे घेणार आहे. मात्र, गुन्हे मागे घेणार म्हणून पुढील काळात कोणी कायदा हातात घेऊन नका अशी कोपरखळीही वळसे पाटलांनी आढळराव पाटलांना मारली.

बैलगाडा शर्यतबंदी हि पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णयासाठी आहे. केंद्र व राज्य सरकार दोघेही बैलगाडा शर्यती सुरु होण्यासाठी सकारात्मक आहेत. त्यामुळे पुढील काळात बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी सर्वपक्षीय एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे वळसे पाटलांनी जाहिर केले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार शिवाजी आढळराव पाटील हे दोन जुने मित्र आज मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्रमात एकत्र आले होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Employees Bonus : दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांची लॉटरी! इतक्या दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Makhana Vs Peanuts: मखाने की शेंगदाणे? नवरात्रीच्या उपवासाला काय खाणे अधिक फायदेशीर?

Blue Drum Verdict Case : निळ्या ड्रममधील हत्याकांडप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कान आणि साहिलला सुनावली फाशीची शिक्षा!

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणी कपातीविरोधात मनसेचे मटका फोड आंदोलन

Iphone Offer: 1 लाखाचा आयफोन फक्त 50 हजारांत, कुठे आहे ही भन्नाट ऑफर?

SCROLL FOR NEXT