- संजय राठोड
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पालिकेने मालमत्ता कर वाढविल्याने आज (साेमवार) आम्ही दिग्रसकर संघटनेने तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी केलेल्या आवाहनानूसार दिग्रस शहर बंदला (digras bandh) 100 टक्के प्रतिसाद लाभला. दिग्रस शहरातील नागरिकांनी पालिकेच्या विराेधात माेर्चा काढला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पालकमंत्री संजय राठाेड (yavatmal guardian minister sanjay rathod) यांनी राज्य शासनास दिग्रस शहरातील वाढीव घरपट्टीबाबत याेग्य विचार व्हावा अशी मागणी केली हाेती. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या आदेशामुळे दिग्रस शहरातील नागरिकांवर आर्थिक बाेजा पडणार आहे. भरसाठ केलेली कर वाढ आम्हा दिग्रस शहरवासियांना मान्य नाही असे आंदाेलकांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी यांनी निर्णयाचा फेर विचार करावा या मागणीसाठी आज दिग्रस शहरातील सर्व दुकाने, प्रतिष्ठाने व भाजी मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारो नागरिक एकत्रित येऊन मोर्चा काढला. या माेर्चानंतर तहसीलदारा मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.