Anil Deshmukh 
महाराष्ट्र

Anil Deshmukh: 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'; पुस्तकातून अनिल देशमुखांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Anil Deshmukh Book: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुस्तक लिहिले असून यातून त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. देशमुख यांनी तुंरुगात असताना हे पुस्तक लिहिले आहे.

Tanmay Tillu

ऐन विधानसभेच्या तोंडावर आजी-माजी गृहमंत्र्यांचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होणार आहे. त्यामुळे फडणवीस आणि देशमुखांमध्ये वाद विकोपाला जाणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'डायरी ऑफ होम मिनिस्टर'

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पुस्तक लिहिले आहे. अनिल देशमुख हे 14 महिने तुरुंगात राहीले असून तुरुंगात असतानाच त्यांनी हे पुस्तक लिहायला घेतले होते. "डायरी ऑफ होम मिनिस्टर" असं या पुस्तकाचं नाव असून हे पुस्तक हिंदी, इंग्रजी आणि मराठी अशा तीनही भाषांमध्ये प्रसिद्ध केले जाणार आहे. अनिल देशमुख यांनी हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे म्हटले असून त्यांनी याबाबतचे ट्विटही केले आहे.

अनिल देशमुखांविरोधातील प्रकरण काय ?

मविआ सरकारमध्ये अनिल देशमुख गृहमंत्री

सचिन वाझेसह कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप

देशमुखांना नोव्हेंबर 2021 मध्ये अटक

आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून 12 तास चौकशी

सचिन वाझेचे अनिल देशमुखांवर आरोप

दरम्यान या पुस्तकात काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

गृहमंत्र्यांच्या डायरीत दडलंय काय?

- 'डायरी ऑफ होम मिनिस्टर' असं या पुस्तकाचं शीर्षक

- 100 कोटींच्या आरोपांवर भाष्य ?

- 14 महिन्यांच्या तुरुंगातील किस्से असल्याची माहिती

- अँटिलिया प्रकरणी नव्यानं भाष्य?

- सचिन वाझे,मनसुख हिरेन,परमबिर सिंग प्रकरणावर भाष्य़?

- विधानसभा निवडणुकीदरम्यान पुस्तक येण्याची शक्यता

- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन ?

अर्थात, पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आरोपांचे नवे बॉम्ब फुटणार एवढं नक्की..त्यामुळे फडणवीस आणि देशमुखांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT