Bribe Trap
Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: विहिरीची नोंद कमी करण्यासाठी दहा हजारांची लाच; मंडळ अधिकारी गजाआड

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : शेतीच्या सातबारावर असलेली विहिरीची नोंद कमी करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना येथील मंडळ अधिकारीस रंगेहाथ पकडले आहे. ए.सी.गुजर यास धुळे (Dhule) येथील लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने मुद्देमालासकट गजाआड केले. (Breaking Marathi News)

वकवाड (ता. शिरपूर) शिवारात वडिलोपार्जित शेती असलेल्या शेतकऱ्याकडून लाच घेतांना गुजर याला पकडण्यात आले. शेतकऱ्याच्या (Farmer) शेतात विहीर असल्याची चुकीने नोंद करण्यात आली होती. त्यामुळे संबंधिताला विहिरीसाठी शासकीय अनुदान मागणीचा अर्ज करता येत नव्हता. त्याने पाठपुरावा केल्यानंतर वकवाड येथील तलाठ्याने पाच महिन्यांपूर्वी फेरफार नोंद केली. मात्र मंडळ अधिकाऱ्याच्या सहीशिवाय विहिरीची नोंद कमी करता येणार नव्हती. त्यामुळे त्याने मंडळ अधिकारी अशोक चिंधू गुजर याला भेटून नोंद कमी करण्याची विनंती केली.

निवृत्‍तीचे राहिले होते दोनच वर्ष

शेतजमिनीसंदर्भात पूर्वी केलेले हक्कसोडीचे काम व विहिरीसंदर्भात फेरफार नोंदीची मंजुरी अशा मोबदल्यात गुजर याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती दहा हजार रुपयात व्यवहार निश्चित झाला. शेतकऱ्याने (Dhule ACB) धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची खात्री झाल्यानंतर पथकाने सापळा रचून निवासस्थानी लाच घेतांना गुजर याला अटक केली. गुजर वरिष्ठ मंडळ अधिकारी असून त्याच्या निवृत्तीला अवघी दोन वर्षे शिल्लक आहेत. मंगळवारी (ता.१०) दुपारी शहरातील मिलिंद नगर येथील गुजर याच्या राहत्या घरी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Problem : डायबेटीजने त्रस्त महिलांनी हे फळ रोज खावे; रक्तातील साखर लगेचच कंट्रोलमध्ये येणार

Beed News: मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT