Dhule Crime News Saam TV
महाराष्ट्र

Dhule Crime News: नदीपात्रातून अवैध वाळू तस्करीमुळे ग्रामस्थ संतप्त; आक्रमक पवित्रा घेत केला रास्ता रोको

Sindkheda Rasta Roko: संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना याबाबत सकारात्मक कारवाई संदर्भातील आश्वासन दिलेय.

साम टिव्ही ब्युरो

Smuggling News:

शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणा येथे बुराई नदीपात्रामधून अवैधपणे मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलीये. चिमठाणे शिंदखेडा रस्त्यावर उतरून ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायतचा ठराव मंजूर झाल्यानंतर देखील, बुराई नदी पात्रामधून अवैधपणे मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. आक्रमक ग्रामस्थांनी आपला मोर्चा हा चिमठाणे शिंदखेडा रस्त्यावर वळवला असता रस्त्यावर या सर्व आक्रमक ग्रामस्थांनी जवळपास दीड ते दोन तास ठिय्या मांडून रास्ता रोको केला.

या रास्ता रोको दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला. अखेर तब्बल एक ते दीड तासानंतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना याबाबत सकारात्मक कारवाई संदर्भातील आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अखेर ग्रामस्थांनी रास्ता रोको थांबवला.

गांज्याची शेती पोलिसांनी केली उध्वस्त

धूळ्यामध्ये सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडताना पाहायला मिळतात. वाळू त्सकरीसह अंमली पदार्थांच्या घटना देखील येथील काही गावांमध्ये उघडकीस आल्यात. काही दिवसांपूर्वी शिरपूर तालुक्यामध्ये गांज्याच्या दोन वेगवेगळ्या कारवाया पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आल्या होत्या. एका कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कापूस आणि तूरच्या शेतीच्या आडून होत असलेली गांज्याची शेती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उध्वस्त केली होती. यामध्ये जवळपास 56 लाख रुपयांचा गांज्या पोलिसांनी हस्तगत केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT