Shirpur Accident Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Accident: पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीत कोसळला; शिरपूरच्या सावळदे पुलावरील घटना

Dhule News : प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह केले जात आहेत

भूषण अहिरे

धुळे : इंदोरकडून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक पुलावरून थेट नदीपात्रात गेल्याचा प्राथमिक अंडज वर्तविला जात आहे. (Shirpur) शिरपूरजवळील तापी नदीच्या (Tapi River) सावळदे पुलावरून ट्रक जात असताना हा अपघात घडला असून ट्रक थेट तापी नदी पात्रात बुडाला आहे. (Tajya Batmya)

धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या तापी नदीवरील सावळदे पुलावरून थेट तापी नदी पात्रात ट्रक बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुलावरून ट्रक नदीत पडल्याने पाण्यात बुडाला आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना सातत्याने या पुलावर झाल्या आहेत. तरी देखील प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह केले जात आहेत. (Accident) यापूर्वी देखील जलसमाधी मिळालेल्या वाहनांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले नसून आता बुडालेल्या ट्रकला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळेल का हे बघणं औचित्याच ठरणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रकमध्ये किती लोक? 

इंदोरकडून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक पुलावरून थेट नदीपात्रात गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून ट्रकमध्ये किती जण अडकले या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही, यासाठीचे शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Shani Yuti: दिवाळीपूर्वी शनी-शुक्र बनवणार दुर्मिळ संयोग; करियर आणि बिझनेसमध्ये होणार लाभ

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT