Dhule Zp School Saam tv
महाराष्ट्र

Dhule Zp School : शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा; जिल्हा परिषदेची शाळा भरतेय कुडाच्या झोपडीत

Dhule News : पिरपाणी गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळा कुडाच्या झोपडीत भरविली जात आहे. या शाळेच्या वर्गखोलीचे पक्के बांधकाम व्हावे; यासाठी अनेकवेळा प्रस्ताव देऊन देखील काही उपयोग झाला नाही

भूषण अहिरे

धुळे : जिल्हा परिषद शाळांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे अनेक ठिकाणी पाहण्यास मिळते. यातच शिक्षण मंत्र्यांच्या शेजारच्या जिल्ह्यातच शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे, कारण शिरपूर तालुक्यात असलेल्या पीरपाणी येथे जिल्हा परिषदेची शाळा अक्षरशः कुडाच्या झोपडीत भरविली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे विद्यार्थी भर पावसामध्ये कुडाच्या झोपडीत शिक्षणाचे धडे गिरवताना दिसून येत आहेत. 

एकीकडे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राज्य सरकारला खरंच तळागाळापर्यंत विकासाची गंगा पोहोचली आहे का? असा प्रश्न देखील पडत नसल्याचे धुळे जिल्ह्यातील पीनपाणी गावात चिमुकल्या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेची कुडाच्या झोपडीत भरणाऱ्या शाळेवरून दिसून येत आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न केले जातात. तर दुसरीकडे शाळांमध्ये शिक्षणाचे तीन तेरा वाजल्याचे पाहण्यास मिळतेय.  

अनेकवेळा प्रस्ताव देऊनही उपयोग होईना 

दरम्यान शिरपूर तालुक्यातील पिरपाणी गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळा कुडाच्या झोपडीत भरविली जात आहे. या शाळेच्या वर्गखोलीचे पक्के बांधकाम व्हावे; यासाठी अनेकवेळा प्रस्ताव देऊन देखील काही उपयोग होत नसल्याचे येथील मुख्याध्यापकांनी सांगितले आहे. पिरपाणी पाड्याप्रमाणे अभयारण्य क्षेत्रात आणखी ६ पाड्यांवर अशीच अवस्था असून तेथे देखील जिल्हा परिषद शाळा झोपडीतच भरावी लागत असल्याचे यावेळी ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले‌ आहे. 

पावसात गळते पाणी 

पावसाळा असल्याने जोरदार पाऊस आल्यानंतर झोपडी असलेल्या शाळेच्या छतावरून पाणी गळत असते. अशाच परिस्थितीत विद्यार्थी बाकावर बसून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. यामुळे विकासाच्या गप्पा करणाऱ्या सरकारची उदासीनता व विकासाची गंगा कशा पद्धतीने उलटी वाहत आहे; हेच यावरून स्पष्ट होत आहे. शिक्षण घेण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील या चिमुकल्या विद्यार्थ्यांची धडपड सुरू असून या सरकारला दिसणार तरी कधी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

SCROLL FOR NEXT