Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News : अकरा लाखांचा गुटखा भरलेला ट्रक पकडला; शिरपूर पोलिसांची कारवाई

Dhule News : सेंधव्याकडून शिरपूरकडे गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड (ता. शिरपूर) येथील सीमा तपासणी नाक्याजवळ (Shirpur) ट्रकमधून पोलिसांनी ११ लाख रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखू जप्त केला. शिरपूर पोलिसांनी (Shirpur Police) ही कारवाई करताना चालकाला अटक केली. (Tajya Batmya)

सेंधव्याकडून शिरपूरकडे गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यावरून उपनिरीक्षक कृष्णा पाटील व सहकारी पेट्रोलिंग करीत होते. सकाळी हाडाखेड सीमा तपासणी नाक्याजवळ पोलिसांनी (Police) संशयित ट्रकला अडविले. चालक धर्मेंद्र सजन राव (वय ३१, रा. पोलाय, ता. बागली, जि. देवास, मध्य प्रदेश) याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१९ लाख ७० हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली. त्यात साडेसात लाख रुपयांची स्वीट सुपारी, ७० हजार रुपये किमतीचा गुटखा, सव्वातीन लाखांचा पानमसाला, ५२ हजार रुपयांची तंबाखू असा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी संशयिताला अटक केली. ट्रकसह मुद्देमालाची एकूण किंमत १९ लाख ७० हजार ३८६ रुपये आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, हवालदार संदीप ठाकरे, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, अल्ताफ मिर्झा यांनी ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT