Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News : कारमधून गांजाची तस्करी; ५४ किलो गांजासह तिघांना अटक

Shirpur News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडवानी जिल्ह्यात आंतरराज्यीय नाक्यांवर ऑपरेशन प्रहारअंतर्गत तपासणी मोहीम सुरू आहे.

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : मुंबई- आग्रा महामार्गावरून अवैधरित्या गांजाची कारमधून वाहतूक केली जात होती. ही कार (Shirpur) महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात असताना बिजासन घाटात सेंधवा (जि. बडवानी, मध्य प्रदेश) पोलिसांनी (Police) कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Tajya Batmya)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडवानी जिल्ह्यात आंतरराज्यीय नाक्यांवर ऑपरेशन प्रहारअंतर्गत तपासणी मोहीम सुरू आहे. महाराष्ट्रातून (Madhya Pradesh) मध्य प्रदेशात गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पुनीत गेहलोद यांना मिळाली होती. त्यांनी (Dhule) सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. महाराष्ट्रातून आलेल्या वाहनांची बिजासन येथे तपासणी सुरू झाली. त्यानुसार कार अडवून तपासणी केली असता तीन प्लॅस्टिक गोण्यांमध्ये भरलेला गांजा आढळला. त्याचे वजन ५४ किलो असून, किंमत दहा लाख ४० हजार रुपये आहे. कारसह एकूण १७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिघांना अटक
गांजा तस्करी करताना आढळलेले कारमधील संशयित भय्यासिंह कलसिंह डावर (पावरा, वय २८), संदीप सीताराम डुडवे (१९, दोघे रा. निलगिरी पाडा, पळासनेर, ता. शिरपूर) व दिनेश दशरथ कनोजे (३४, रा. हिगाव, ता. शिरपूर) यांना अटक करण्यात आली. हे तिघेही शिरपूर तालुक्यातील रहिवाशी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT