Shirpur Bribery Trap Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Bribery Trap: कृषी विस्तार अधिकारी आठ हजारांची लाच घेताना ताब्‍यात

कृषी विस्तार अधिकारी आठ हजारांची लाच घेताना ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : विहिरीसाठी योजनेतून अनुदान मिळवून दिल्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून आठ हजार रुपयाची लाच (Bribe) स्वीकारताना येथील पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्‍याला गुरुवारी (२२ जून) धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Dhule ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ज्ञानेश्वर भगवान पाटील असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. (Breaking Marathi News)

ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत लाभार्थी शेतकऱ्याला (Farmer) नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पाहणी करून शेतकऱ्याला शिफारसपत्र देणे आवश्यक असते. वाकपाडा (ता. शिरपूर) येथील शेतकरी महिलेस विहीर मंजूर होऊन अनुदानाचा पहिला हप्तादेखील मिळाला. उर्वरित काम पूर्ण करून महिलेचा मुलगा त्याचा खर्च जमा करून शिल्लक अनुदानाची चौकशी करण्यासाठी पंचायत समितीमध्ये गेला.

संशयित डी. बी. पाटील यांनी ‘मी तुझ्या दुसऱ्या हप्त्याचे एक लाख ३१ हजार रुपयांचे काम केले, असून त्या मोबदल्यात मला दहा हजार रुपये दे, पैसे काढल्यावर मला भेटायला ये’ असे सांगितले. तक्रारदार शेतकऱ्याने २१ जूनला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक शाखेशी संपर्क साधून तक्रार केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर पथकाने सापळा रचला. गुरुवारी शहरातील न्यायालयापुढे कन्या विद्यालयासमोर असलेल्या हॉटेलमध्ये शेतकऱ्याकडून डी. बी. पाटील यांनी लाचेच्या रकमेपैकी आठ हजार रुपये स्वीकारले. त्याचवेळी (Dhule) पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

Society Rule : सोसायटीत जिम अन् स्विमिंग पूलचे वेगळे पैसे घेतले जातायत? मग ही बातमी नक्की वाचा, तुमचे हक्क काय सांगतात

SCROLL FOR NEXT