Pune News: डमी अधिकारी होवून लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष; तरुणाची २८ लाख रुपयांची फसवणूक

भारतीय लष्करात नोकरी लावून देतो या प्रकरणात १०० हून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले
Pune News
Pune NewsSaam tv
Published On

अक्षय बडवे

पुणे : भारतीय लष्‍करात नोकरी लावून देण्याचे आमिष देत तरूणाची फसवणूक (Fraud) झाल्‍याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर खात्री आणि विश्वास बसावा; म्हणून आरोपीने डमी (Pune) अधिकारी देखील उभे केले होते. (Tajya Marathi News)

Pune News
Pune Fight Over Dog: कुत्र्याच्या कारणावरून भांडण; महिनाभरानंतर तरुणांनी केला कोयत्याने हल्ला

प्रमोद यादव असे आरोपीचे नाव असून तो मूळचा नाशिकचा आहे. याबाबत राहुल बच्छाव यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे भारतीय लष्करात भरतीसाठी प्रयत्न करत होते. यावेळी त्यांची ओळख प्रमोदशी झाली. तेव्हा प्रमोदने त्यांना वारंवार परीक्षेसाठी पैश्याची मागणी केली. तसेच परीक्षा देण्यासाठी तुम्हाला यायला लागेल, त्याची तयारी करावी लागेल असे खोटे मार्गदर्शन केले. भारतीय लष्करात नोकरी लावून देतो या प्रकरणात १०० हून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Pune News
Jalgaon Bike Accident News: दुचाकीची लिफ्ट बेतली जिवावर; चाकात साडी अडकून वृद्ध महिला पडली रस्त्यावर

लष्‍कराच्‍या युनिफाॅर्ममध्‍ये डमी अधिकारी

आरोपी प्रमोदने राहुलचा विश्वास संपादन करण्यासाठी (Indian Army) भारतीय लष्कराच्या युनिफॉर्म ७ ते ८ डमी अधिकारी उभे केले. हा संपूर्ण प्रकार सप्टेंबर २०२२ पासून आजपर्यंत सुरू होता. मात्र वारंवार पैसे देऊन सुद्धा पुढे काही होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुलने पोलिसात तक्रार दिली आहे. यानंतर सदरची कारवाई स्पेशल इनपुट मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण विभाग पुणे आणि पुणे पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com