Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : बिजासन घाटात दरोडा; गाडी अडवत १८ लाख रुपयांची रोकड लुटली

Dhule Shirpur News : शिरपूर पासून जवळ असलेल्या बिजासन घाटात घर दुपारच्या वेळी हि घटना घडली आहे. या घटनेत गुजरातच्या सुरत येथील व्यापारी जितेंद्रकुमार जयंतीभाई पटेल यांना फॉर्च्युनर गाडी घ्यायची होती

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : भर दुपारच्या वेळी महामार्गावरील बिजासन घाटात दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशात कार घेण्यासाठी गेले असताना व्यवहार न झाल्याने परत येताना कार अडवत चाकूचा धाक दाखवून तब्बल १८ लाख रुपयांची रोकड व दोन मोबाईल दरोडेखोरांनी लुटले. या प्रकरणी पंधरा दिवसानंतर सांगवी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर पासून जवळ असलेल्या बिजासन घाटात घर दुपारच्या वेळी हि घटना घडली आहे. या घटनेत गुजरातच्या सुरत येथील व्यापारी जितेंद्रकुमार जयंतीभाई पटेल यांना फॉर्च्युनर गाडी घ्यायची होती. यातच मध्य प्रदेशातील इंदोर येथे सेकंडहँड कारचा मोठा बाजार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यांना दुसरे काम असल्याने ते बाहेरगावी गेल्याने त्यांनी राजेंद्रकुमार व महेशभाई या दोन सहकार्‍यांजवळ रोकड देऊन कार घेऊन येण्यास सांगितले. 

आठ ते दहा जणांच्या टोळक्याने केली अडवणूक 

त्यानुसार २३ मेस दोघेही खाजगी वाहनाने इंदोरला गेले. याठिकाणी गेले असता कार खरेदीचा व्यवहार होऊ शकला नाही. त्यामुळे २५ मे रोजी दोघेही सुरत येथे परत जाण्यासाठी निघाले. दरम्यान शिरपूरजवळ बिजासन घाटात दुपारच्या वेळी सुमसाम रस्ता असल्याचा फायदा घेत दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान त्यांच्या वाहनाला आठ ते दहा जणांच्या टोळीने अडवले. यानंतर त्यांना चाकू व कोयत्यांचा धाक दाखवून १८ लाखांची रोकड व दोघांचे मोबाईल हिसकावून संशयित फरार झाले. 

पोलिसात गुन्हा दाखल 

यानंतर राजेंद्रकुमार व महेशभाई हे भेदरलेल्या अवस्थेत सुरतला निघून गेले. मालक जितेंद्रभाई पटेल परत आल्यानंतर त्यांना दरोड्याची माहिती दिली. यानंतर ७ जूनला पटेल यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद देत अज्ञात संशयितांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक मिलिंद पवार तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

SCROLL FOR NEXT