Shirpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Crime News : दिवसभर सोबत फिरल्यानंतर क्षुल्लक कारणावरून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच केली हत्या

Dhule News : देवा बहिरम व आरोपी विकास महाले हे दोघेही जवळचे मित्र होते. घटना घडण्याच्या दिवशी ते दिवसभर एकत्र होते. तर सायंकाळी हॉटेलमध्ये जाऊन दोघांनीही दारू प्यायली. दारूची नशा चढल्याने दोघांनाही भान नव्हते

भूषण अहिरे

धुळे : दोघे जिवलग मित्र असल्याने नेहमी सोबत रहायचे. तर अधून मधून सोबतच हॉटेलमध्ये जाऊन दारू पिणे आणि जेवण देखील करायचे. त्यानुसार दिवसभर सोबत फिरल्यानंतर रात्री दारूच्या नशेत क्षुल्लक कारणातून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत गेले. यातून जिवलग मित्राने डोक्यात दगड घालून मित्राचीच हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शिरपूरमध्ये घडली आहे.

धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात सदरची घटना घडली असून या घटनेत देवा बहिरम असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. तर विकास विजय महाले याने हे दारूच्या नशेत भयानक कृत्य केले आहे. या हत्येच्या घटनेने शिरपूर हादरले आहे. दरम्यान मृत देवा बहिरम व आरोपी विकास महाले हे दोघेही जवळचे मित्र होते. घटना घडण्याच्या दिवशी ते दिवसभर एकत्र होते. तर सायंकाळी हॉटेलमध्ये जाऊन दोघांनीही दारू प्यायली. 

किरकोळ वादातून भयानक कृत्य 

दारूची नशा चढल्याने दोघांनाही भान नव्हते. यातच नशेत त्यांच्यात वाद झाला आणि वादाचे पर्यवसन भांडणात झाले. यात विकास महाले याने दारूच्या नशेतच रागाच्या भरात देवा बहिरम या मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. डोक्याला मार लागल्याने देवा जमिनीवर कोसळला. यानंतर काही जणांनी त्याला जखमी अवस्थेत तातडीने धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करत संशयित आरोपी विकास महाले यास तत्काळ अटक करून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT