Sakri Crime Saam tv
महाराष्ट्र

Sakri Crime : जन्मदात्या बापालाच संपविले; किरकोळ वादातून मुलाचे कृत्य

Dhule News : साक्री तालुक्यातील खारगाव येथील बापू पांड्या कुवर (वय ५३) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेतीकाम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते

Rajesh Sonwane

धुळे : घरात किरकोळ कारणावरून वडील व मुलाचा वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन जेवण करत असलेल्या वडिलांच्या डोक्यात दगड मारून वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यातील खरगाव येथे घडली आहे. घटनेनंतर मुलगा पसार झाला होता मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत ताब्यात घेतले आहे. 

साक्री (Sakri) तालुक्यातील खारगाव येथील बापू पांड्या कुवर (वय ५३) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेतीकाम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यासोबत पत्नी फुलाबाई कुवर (वय ५०) व मुलगा विजय बापू कुवर (वय २५) यांच्यासह वास्तव्यास होते.. दरम्यान पत्नी शेतात गेली असल्याने बापू कुवर हे घरी एकटेच होते. ५ सप्टेंबरला सायनाकलच्या सुमारास ते जेवण करत होते. यावेळी त्यांचा मुलगा विजय हा घरी आला व त्याने वडिलांशी किरकोळ कारणावरून वाद (Crime News) घालण्यास सुरवात केली. 

दरम्यान वडिलांसोबतचा वाद विकोपाला गेल्याने विजय याने संतापाच्या भरात बापू कुवर यांच्या डोक्यात दगड टाकून खून केला. या घटनेनंतर विजय याने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यानंतर संशयित आरोपी फरार झालेल्या मुलाचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना शहरातील मोकाट कुत्र्याच्या प्रश्नावरून शिवसेना आक्रमक

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आमदाराचा पुतण्या, कोण आहे क्रिश भगत?

Khed : सावधान! करणीच्या नावाखाली भोंदू बाबाने पाडली कुटुंबात फूट; खेडमध्ये संतापजनक घटना

Blood Pressure: BP नॉर्मल असूनही वाढतो हार्ट ब्लॉकेजचा धोका, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Rude People Behavior: उद्धट लोकांशी कसं वागावं? गप्प बसण्यापेक्षा उत्तर देणं कसं फायदेशीर ठरतं?

SCROLL FOR NEXT