Sakri Accident News Saam tv
महाराष्ट्र

Sakri Accident News : वाढदिवसाच्या दिवशीच घेतला अखेरचा निरोप; गावी जाताना अपघात

वाढदिवसाच्या दिवशीच घेतला अखेरचा निरोप; गावी जाताना अपघात

साम टिव्ही ब्युरो

कासारे (धुळे) : बेहेड (ता. साक्री) येथील उमेश (सोनू) तोरवणे व सुमीत पवार हे दोघे दुचाकीवरून जात होते. सणसवाडी हद्दीत या दोघांना पुण्याच्या (Pune) दिशेने जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. दुचाकीला कारची धडक बसल्याने दुचाकीवरील सोनू ठार झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात (Accident) रविवारी मध्यरात्री घडला. (Tajya Batmya)

सोनू नोकरीनिमित्त पुणे येथे बहिणीकडे राहात होता. सोमवारी त्याचा वाढदिवस असल्यामुळे गावी (बेहेड, ता. साक्री) यायचे होते. मित्राला घेऊन दुचाकीवरून पुणे येथे जात असताना अपघात घडला. सोनू साधारण शेतकरी कुटुंबातील दोन विवाहित बहिणींचा एकुलता भाऊ होता. सोनूच्या अशा जाण्याने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. वाढदिवसाच्याच दिवशी निरोप देण्याचा प्रसंग आई-वडील, बहिणी, आप्तेष्टांवर येऊन ठेपला.

सोनूचा मित्र सुमीत विकास पवार (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी गोकूळ भीमराव जाधव (रा. आळंदी फाटा, लोणीकंद, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून, कारचालक सुनील ऋषिकेश बेंडभर (रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राकेश मळेकर पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT