Dhule Rain Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : विजांच्या गडगडासह पावसाची जोरदार हजेरी; पिकांचे नुकसान 

Dhule News : हवामान विभागातर्फे राज्यातील काही भागात तीन दिवस अवकाळी पासवाची शक्यता वर्तविण्यात आली होती

Rajesh Sonwane

धुळे : सकाळपासूनच आज ढगाळ वातावरण होते. या दरम्यान आज दुपारच्या वेळी विजांच्या गडगडाटासह पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांना फायदा जोवर असला तरी शेतात (Dhule) असलेल्या कापूस व भट पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागातर्फे राज्यातील काही भागात तीन दिवस अवकाळी पासवाची शक्यता वर्तविण्यात (Rain Alert) आली होती. वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहण्यास मिळाले होते. दरम्यान धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विविध ठिकाणी दुपारची एक ते दीड वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. शिवाय सकाळपासूनच हवेत देखील गर्व निर्माण झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, काढणीला आलेल्या कापूस पिकाचे, त्याचबरोबर काढनीला आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे, अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT